नागपूर -नागपूर जिल्ह्यातील हिंगणी-सेलू मार्गावरील पेंढरी घाटात एक खासगी ट्रॅव्हल Travels plunged into deep ravine Pendhari Ghat बस खड्ड्यात पडल्याची माहिती समोर आली आहे. बसमध्ये ३० प्रवासी असून त्यापैकी ५ प्रवासी जखमी झाले आहेत. नागपूरकडून हिंगणी मार्गे वर्धाकडे जाणारी ट्रॅव्हल्स २० फूट खोल दरीत कोसळली आहे. पेंढरी घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचं बोललं जातं आहे.
हिंगणी-सेलू मार्गावरील पेंढरी घाटात खासगी ट्रॅव्हल्स बस २० फूट खोल दरीत कोसळल्याने अपघात घडला (Nagpur Bus Accident) आहे. या अपघातात बसमध्ये प्रवास करत असलेले १० प्रवाशी जखमी झाले असून ५ प्रवाशी गंभीर असल्याने त्यांना हिंगणा येथील लता मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.