नागपूर - वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावून शहरभर मिरवणाऱ्याविरोधात कारवाई होत नाही, असा समज तरुणाईमध्ये वाढला आहे. मात्र, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी स्वतः एका बुलेट चालकावर कारवाई केली आहे. 'आदत बुरी हैं, लेकीन शौक उँचे हैं', अशा आशयाची नंबर प्लेट त्या चालकाने लावली होती. त्याच्यावर तब्बल १० हजार ३०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या चालकाला १० हजारांचा दंड स्वतः आणि गाडीची ओळख लपवण्यासाठी गाडीच्या क्रमांकाला आई, भाई असा आकार देणाऱ्या वाहन चालकाचा सुळसुळाट वाढला होता. त्यासंदर्भात अनेक तक्रारी नागपूर पोलीस विभागाला प्राप्त झाल्या आहेत. अशा वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्याचा दृष्टीकोणातून एक मोहीम सुरू करण्याचा विचार वाहतूक पोलीस विभाग करत होते. तेवढ्यात असतानाच एक असा वाहनचालक पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या हाती लागला. त्यामुळे डोक्यात असलेल्या मोहिमेचा नकळत श्री गणेशा झाला आहे.
मध्य भारतात सर्वाधिक दुचाकींचा संख्या ही नागपूर शहरात आहे. त्यातही महाविद्यालयात जाणाऱ्या तरुणांकडे सर्वाधिक दुचाकी आहेत. आपली गाडी इतरांच्या गाडीपेक्षा कशी वेगळी दिसेल. यावरच नागपुरातील तरुणाईचा भर दिसतो. वाहनांच्या क्रमांकाला भाई, आई, काका, मामा असे आकार देऊन वाहन कायदा पायदळी तुडविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. यासंदर्भात अनेक तक्रारी देखील पोलीस विभागाला प्राप्त झाल्या होत्या. मात्र, वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावून शहरभर मिरविणाऱ्यांवरही कारवाई होत नाही, असा समज हुल्लडबाजी करणाऱ्या वाहनचालकांचा पसरला होता.
फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी स्वतः एका बुलेट चालकावर कारवाई केली आहे. 'आदत बुरी हैं लेकीन शौक उँचे है' अश्या आशयाची नंबर प्लेट लावून मिरवणाऱ्या वाहन चालकावर चक्क 10 हजार 300 रुपयांचा दंड ठोठावला आहे. मोटार वाहन कायदा-१९८८ व मोटर वाहन नियम-१९८९ अनुसार वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावणे अवैध असतानाही शहरात असंख्य वाहनचालकांची ‘भाई’गिरी सुरू आहे. गुन्हेगारी कारवायांमध्ये वापरण्यात येणाऱ्या वाहनांची ओळख पटू नये म्हणून फॅन्सी नंबर प्लेट लावल्या जातात. त्या वाहन चालकावर जुन्याच मोटार वाहन कायद्या प्रमाणे दंड करण्यात आला आहे. नवा कायदा सध्यातरी महाराष्ट्रात लागू झालेला नसल्याने दंडाची रक्कम 10 हजार 300 रुपये झाली. अन्यथा ही रक्कम किती तरी पटीने वाढली असती.