नागपूर :मी पतंग उडवितांना नायलॉन मांजा वापरणार (anti Nylan Manja campaign) नाही, आणि इतर कोणालाही नायलॉन मांजा वापरू देणार नाही’, या आशयाची प्रतिज्ञा विद्यार्थ्यांनी (Students participate) घेतली. यासोबतच पालकांनी आपला पाल्य पतंग उडवतांना कोणता मांजा वापरतो आहे, याकडे लक्ष ठेवण्याचे आणि नायलॉन मांजा वापरल्यास कारवाई होऊ शकते अशी समज आपल्या पाल्यांना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे पालकांना (government schools of Nagpur) करण्यात आले.
छुप्या मार्गाने नायलॉन मांज्याची विक्री सुरूच :बच्चे कंपनीसोबतचं सर्व वयोगटातील लोकांचा आवडता उत्सव म्हणजे पतंगबाजी उत्सव सुरू झाला आहे. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने संपूर्ण शहरात पतंगबाजी सुरू झालेली आहे. मात्र, ही पतंगबाजी जेवढा आनंद देते, त्यापेक्षा अधिक दुःख, वेदना आणि त्रासदायक ठरते आहे. याचं कारण म्हणजे नायलॉन मांजा. जीवघेणा ठरत असलेल्या या नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी असताना देखील छुप्या मार्गाने नायलॉन मांजा विक्री केला जातो आहे. नागपूर पोलिसांनी गेल्या आठ दिवसात लाखो रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला असला तरी, विक्रेते आणि ग्राहकांमध्ये जराही कायद्याची भीती नसल्याने नायलॉन मांजा सर्रासपणे विकला जातो आहे. मात्र, आता नागपूर पोलिसांनी नायलॉन मांजा विक्रेत्यांबरोबरचं ग्राहकांना अद्दल घडवण्याचा निर्धार केला आहे. सर्व-सामान्य नागरिकांच्या मदतीने पोलीस कारवाई करणार असल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.
नायलॉन मांज्यावर पोलिसांची नजर :पतंगबाजी करताना जिथे नायलॉन मांजा वापर होत असेलेल्या भागात ड्रोन कॅमेराच्या मदतीने तपासणी केली जाणार आहे. याशिवाय बिट- मार्शलला देखील कारवाईचे निर्देश देण्यात आले आहे. कुठे कुठे नायलॉन मांजाचा वापर होत असल्याचा आढावा घेऊन डीलर्सवर कारवाई सुरू करण्यात आली असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. याच बरोबर रेकॉर्डवरील नायलॉन मांजा विक्रेत्यांवर पोलिसांचे बारीक लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले आहे.