नागपूर- राज्याच्या उपराजधानीत आजही कोरोनाचा उद्रेक बघायला मिळाला. आज नागपुरात 57 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 920 इतकी झाली आहे.
चिंताजनक....आज नागपूर जिल्ह्यात 57 कोरोनाबाधित रुग्णांची भर; एकूण रुग्ण 920
काल सुद्धा 85 नवीन रुग्णांची नोंद झाल्याने संपूर्ण यंत्रणा हादरून गेली होती. त्यानंतर आजही 57 नवीन रुग्णांची भर पडल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
काल सुद्धा 85 नवीन रुग्णांची नोंद झाल्याने संपूर्ण यंत्रणा हादरून गेली होती. त्यानंतर आजही 57 नवीन रुग्णांची भर पडल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. मात्र सर्वसामान्य नागरिक अजूनही बेजबाबदार पणे वागत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. आज 5 रुग्ण कोरोनावर यशस्वीरित्या मात करून घरी परतले आहेत, त्यामुळे नागपुरातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 530 झाली आहे. तर आता पर्यंत 15 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
आज नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये लष्करीबाग, नाईक तलाव, मोमीनपुरा आणि बांग्लादेश येथील नागरिकांचा समावेश आहे. या भागात कोरोनाबाधित रुग्ण पुढे आल्याने प्रशासनाने त्यांना आधीच विकगीकृत केले होते. त्या पैकी संशयित्यांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आलेला आहे. सध्या नागपुरात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 375 झाली असून त्यांच्यावर मेयो, मेडिकल आणि एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.