नागपूर- स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी राष्ट्रपती पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण ४६ पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि ५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. उत्कृष्ट सेवेकरिता नागपूर पोलीस दलातील ३ पोलीस कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे.
नागपूर पोलीस दलातील 3 कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
वाहतूक शाखेत कार्यरत असलेले नितीन शिवलकर, गुन्हे शाखेत कार्यरत असलेले अशोक तिडके आणि परिमंडळ 3 मध्ये कर्तव्य बजावत असलेले विश्वास ठाकरे यांचा समावेश आहे.
पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेबद्दल राज्यातील ५१ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस पदके जाहीर झाली आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरातील एकूण ९४६ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी विविध पदके जाहीर केली आहेत. त्यात नागपूर पोलीस दलातील ३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ज्यामध्ये वाहतूक शाखेत कार्यरत असलेले नितीन शिवलकर, गुन्हे शाखेत कार्यरत असलेले अशोक तिड़के आणि परिमंडळ ३ मध्ये कर्तव्य बजावत असलेले विश्वास ठाकरे यांचा समावेश आहे.