नागपूर - काही महिन्यांपासून शांत असलेल्या नागपूरात अचानक खुनाच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या तीन दिवसांमध्ये राज्याच्या उपराजधानी तीन खुनाच्या घटना घडल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे, तरी देखील राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपुरातील गुन्हे कमी झाल्याचा दावा केला आहे.
नागपुरात तीन दिवसांत तीन खून; तरीही गृहमंत्री म्हणतात क्राईम 'इन कंट्रोल' - नागपूर खून बातमी
गेल्या तीन दिवसांत नागपूरात तीन खुनाच्या घटना घडल्या, तरी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपुरातील क्राईम रेट कमी झाल्याचा दावा केला आहे. लॉकडाऊन नंतर आता पुन्हा खुनाच्या घटना वाढू लागल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.
पहिली घटना मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून गोधणी परिसरात बनारसी नामक व्यक्तीचा एका अज्ञाताने खून केला होता, त्यानंतर पोलिसांनी एका आरोपीला अटक देखील केली होती. बनारसी हा गेल्या अनेक दिवसांपासून मानकापूर परिसरात राहत होता. गौरव गायकवाड (41) रा. गोधणी नामक आरोपी सोबत दारू पिण्याच्या कारणावरून त्याचे भांडण झाले होते. त्यातूनच गौरव ने बनारसीचा खून केला. दुसरी घटना नागपूरच्या यशोधरा नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. गाडीचा धक्का लागल्यामुळे वाद निर्माण झालाने विधिसंघर्ष बालकाने धारदार शस्त्राने घाव घालत राजू रंभाडचा या व्यक्तीचा खून केला. राजू गिरणीवर गहू दळण्यासाठी गेले होते. त्याचवेळी आरोपी करण यादव (19 ), शुभम वंजारी(19) दोघे रा. जोशी आखाडा यशोधरा नगर, स्कुटीने जात असताना राजू रंभाड यांच्या गाडीचा धक्का लागला. यानंतर सुरू झालेल्या वादातून यादव नामक आरोपीने चाकूने राजूवर सपासप वार केले. ज्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. या संदर्भात यशोधरा नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. तर तिसरी घटना कपिल नगर भागात घडली आहे. बहिणीला त्रास देताना हटकले म्हणून दीपक राजपूत (26) नामक व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी कपिल नगर पोलिसांनी तुषार सुनिल गजभिये (24) आणि प्रेमचंद उर्फ टोनी मारोतकार(23) दोघे रा. तक्षशिला नगर या दोघांना अटक केली आहे.
गेल्या तीन दिवसांत नागपूरात तीन खुनाच्या घटना घडल्या, तरी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपुरातील क्राईम रेट कमी झाल्याचा दावा केला आहे. राज्याची उपराजधानी कायम गुन्हेगारांचे नंदनवन म्हणून चर्चेत राहिले आहे. लॉकडाऊन नंतर आता पुन्हा खुनाच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्यावर राजकारण होणे स्वाभाविक झाले आहे.