नागपूर - जगातील सर्वात कमी उंचीची महिला ज्योती आमगे यांच्या घरी चोरी झाल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. घरातून नेमका किती माल चोरीला गेला? याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही. मात्र, पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
जगातील कमी उंचीची महिला ज्योती आमगेच्या घरात चोरी - ज्योती आमगेच्या घरात चोरी
ज्योती आमगे आपल्या आई-वडिलांसोबत काही दिवसांपासून परदेशात गेली होती. तिचे बंधू आणि इतर मंडळी घरी होते. त्या मंगळवारी रात्री उशिरा नागपुरात येणार असल्याने तिचे कुटुंबीय तिला घेण्यासाठी विमानतळावर गेले होते. त्याचवेळी चोरट्याने संधी साधत ज्योती यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी कपाटातील वस्तू अस्ताव्यस्त फेकून पोबारा केला.
ज्योती आमगे आपल्या आई-वडिलांसोबत काही दिवसांपासून परदेशात गेली होती. तिचे बंधू आणि इतर मंडळी घरी होते. त्या मंगळवारी रात्री उशिरा नागपुरात येणार असल्याने तिचे कुटुंबीय तिला घेण्यासाठी विमानतळावर गेले होते. त्याचवेळी चोरट्याने संधी साधत ज्योती यांच्या घरात प्रवेश केला. चोरट्यांनी कपाटातील वस्तू अस्ताव्यस्त फेकून पोबारा केला.
दरम्यान ज्योती आणि त्यांचे कुटुंबीय घरी पोहोचले त्यावेळी घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले दिसून आले. त्यावरून घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.