नागपूर- विधसभा निवडणुकीसाठी भाजपने १२५ उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली आहे. नागपूरच्या ६ उमेदवारांसोबत ग्रामीणच्या ३ उमेदवारांचा यात समावेश आहे. त्यात हिंगणा, उमरेड आणि सावनेर मतरदार संघाचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मात्र, या यादीत ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा उल्लेख नाही.
भाजपच्या पहिल्या यादीत 'या' मोठ्या नेत्याच्या नावाचा उल्लेख नाही - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
भाजप ने १२५ उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली आहे. या यादीत ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा उल्लेख नाही. ते कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही.
भाजपच्या पहिल्या यादीत 'या' मोठ्या नेत्याच्या नावाचा उल्लेख नाही
हेही वाचा-विधानसभा निवडणूक 2019 : चार ऑक्टोबरला मुख्यमंत्री भरणार उमेदवारी अर्ज
भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या कामठी मतदार संघातून बावनकुळे निवडणूक लढवतील की काटोल मतदार संघातून हे अजून गुलदस्त्यात आहे. हिंगणाचे समीर मेघे आणि उमरेडचे सुधीर पारवे या विद्यमान आमदारांना भाजपने पुन्हा संधी दिली आहे. तर, सावनेर मतरदार संघासाठी जिल्हा अध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांना यावेळी संधी दिली आहे.