नागपूर - नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोधपथकाच्या जवानांनी शनिवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार २६१ नागरिकांविरुद्ध कारवाई केली आहे. मनपाच्या पथकाने त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपयेप्रमाणे १ लक्ष ३० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी १२,५७५ नागरिकांविरुद्ध कारवाई करुन ४६,४६,५०० रुपये दंड वसूल केला आहे. तर ५०० रुपये प्रमाणे आतापर्यंत ७१०५ बेजबाबदार नागरिकांकडून ३५ लक्ष ५२ हजार ५०० रुपये वसूल केले आहेत.
मास्क न लावणाऱ्या १२ हजार नागपुरकरांकडून ४६ लाखांचा दंड वसुली - मास्कशिवाय फिरणाऱ्या नागरिकांविरुध्द कारवाई
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येकाने मास्क वापरावा, अशा स्पष्ट सूचना असताना देखील नागपुरातील काही बेजबाबदार नागरिक जीवावर उदार होऊन बाहेर फिरत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून हे प्रमाण वाढीस लागल्यानंतर महानगरपालिकेच्या उपद्रव शोधपथकाने कारवाईचा वेग वाढवला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येकाने मास्क वापरावा, अशा स्पष्ट सूचना असताना देखील नागपुरातील काही बेजबाबदार नागरिक जीवावर उदार होऊन बाहेर फिरत असल्याचे सातत्याने दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून हे प्रमाण वाढीस लागल्यानंतर महानगरपालिकेच्या उपद्रव शोधपथकाने कारवाईचा वेग वाढवला आहे. हे शोधपथक दररोज दहा झोनमधील मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांविरुद्ध कारवाई करत आहे.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे अशा सूचना नागपूर मनपाव्दारे वारंवार केल्या जात आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मास्क न वापणाऱ्या नागरिकांना वचक बसावा व त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यादृष्टीने ही दंडाची रक्कम ५०० रुपये करण्यात आली आहे. तरी सुद्धा नागरिक मास्कशिवाय फिरत आहेत.