महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विको कंपनीतील आग भडकण्याचे कारण म्हणजे वॅक्स अन् अल्कोहोल, कंपनीचे ७० टक्के नुकसान - नागपूर आग

नागपूरच्या एमआयडीसी परिसरातील विको लॅबोरेटरीमध्ये रविवार रात्रीपासून लागलेली आग अजूनही धुसमत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत पण आतमध्ये मोठ्या प्रमाणात अल्कोहोल आणि वॅक्सचा साठा असल्याने आगीने उग्र रूप धारण केले आहे.

fire in Vico company
fire in Vico company

By

Published : Mar 8, 2021, 5:26 PM IST

Updated : Mar 8, 2021, 5:33 PM IST

नागपूर -नागपूरच्या एमआयडीसी परिसरातील विको लॅबोरेटरीमध्ये रविवार रात्रीपासून लागलेली आग अजूनही धुसमत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत पण आतमध्ये मोठ्या प्रमाणात अल्कोहोल आणि वॅक्सचा साठा असल्याने आगीने उग्र रूप धारण केले आहे. शिवाय इमारतीचा भाग कोसळल्याने आतमधील भागापर्यंत पोहचण्यासाठी आणि आग विझवण्यासाठी अडचण निर्माण होत असल्याची माहिती मनपा अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी दिली.

नागपुरातील विको कंपनीला आग
विको कंपनीला रात्रीच्या सुमारास आग लागल्याची माहिती अग्नीशमन दलाला मिळाल्यानंतर दोन अग्निशामक बंब पाठविण्यात आले. पण आग मोठी आणि वाढत असल्याने नागपूर मनपाचे आणि वाडी तसेच कळमेश्वर येथून अग्निशामक बंब बोलावण्यात आले आहे. आग विझवण्याचे मागील 12 तासापासून सुरू आहे.

हे ही वाचा -मुकेश अंबानी प्रकरण: राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून होणार तपास
आतमध्ये ज्वलनशील पदार्थांचा साठा -

कॉस्मेटिक कंपनी असल्याने वॅक्स आणि अल्कोहोलचा उपयोग होत असल्याने पाण्याचा मारा करून सुद्धा आग विझत नव्हती. यासाठी फायर रेस्ट्रिक्ट फोमची गरज होती. पण उपलब्ध तोही अल्कोहोलचा साठा असल्याने फारसा परिणामकारक नव्हता. ड्रम हळूहळू पेट घेत राहिले आणि आगीने प्रचंड उग्र रूप धारण केले आहेत. या सगळ्यात प्रचंड तापमान वाढलेले आहे. यामुळे टिनाचे शेड तसेच मागील बाजूने जिथे दंत मंजन निर्माण केले जात होते. त्या भागात दोन मजल्याची इमारत तापमान वाढल्याने कोसळली आहे. यावरून आगीचा अंदाज लक्षात घेता येईल.

जेसीबीच्या साह्याने ढिगारा हटविण्याचे काम -

बिल्डिंगचा भाग कोसळल्याने यात आतील बाजूने असलेले ज्वलनशील पदार्थ पेट घेत आहे. आगीवर नियंत्रण मिळवताना आतील भागात अग्निशामक दलाला पोहचता येत नाही आहे. यामुळे आतील भागात पोहचण्यासाठी जेसीबीच्या साह्याने पडलेल्या इमारतीचा मलबा हटवत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. पण आगीवर नियंत्रण मिळवताना आणखी काही तास लागू शकेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा - मराठा आरक्षणावर सुनावणी स्थगित; 15 मार्च रोजी होणार पुढील सुनावणी

आगीमध्ये मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. इतके तास होऊन आगीवर नियंत्रण न आल्याने नुकसान स्पष्ट होऊ शकले नाही. पण इमारत मशिनरी, कच्चा माल, फिनिश प्रोडक्ट सहा बरेच साहित्य जळून खाक झाले असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. सोबतच आगीचे कारणही अद्याप स्पष्ट झालेले नाही. जवळपास या परिसरात असणाऱ्या 70 टक्के भागाचे नुकसान पोहचले असल्याचे अग्निशामकचे मुख्य अधिकारी राजेंद्र उचके यांनी सांगितले आहे.

Last Updated : Mar 8, 2021, 5:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details