महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विदर्भात उकाडा वाढला, पारा ३७ अंशावर - regions

शुक्रवारनंतर नागपूरसह विदर्भात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना आणखी तीन दिवस पावसाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. अशी माहिती नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने दिली आहे.

temperature-of-nagpur-city-and-other-vidarbha-regions-is-increasing-1

By

Published : Jul 16, 2019, 5:21 PM IST

नागपूर -नागपूरसह विदर्भाच्या बऱ्याच भागात गेल्या १० दिवसांपासून पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे तापमान वाढायला सुरुवात झाली आहे. जून महिना कोरडा गेला आहे. जुलैचा मध्यान सुरू आहे. मात्र, सरासरी पेक्षा कमी पाऊस शहरात पडला आहे. नागपूर शहरात तापमानाचा पारा ३७ वर पोहोचला आहे. या मुळे उन्हाची दाहाकत कायम आहे. आणखी तीन दिवस नागपूरकरांना हा उकाडा सहन करावा लागणार आहे.

विदर्भात उकाडा वाढला, पारा ३७ अंशावर

शुक्रवारनंतर नागपूरसह विदर्भात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना आणखी तीन दिवस पावसाची प्रतिक्षा करावी लागणार आहे, अशी माहिती नागपूर च्या प्रादेशिक हवामान विभागाने दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details