नागपूर:जन्मदात्या आईवडिलांना त्रास देणाऱ्या मुलाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (Nagpur Bench of the High Court) जोरदार दणका दिला आहे. या प्रकरणात न्यायमूर्ती रोहित देव यांनी निर्णय देत पालकांवर अत्याचार करणाऱ्या मुलाला घर रिकामे करण्याचा आदेश (Take the child out of the house ) कायम ठेवला आहे. पीडित पालक नागपूरच्या हंसापुरी भागात राहतात. वडील ७८ तर आई ६५ वर्षांची आहे. त्यांच्या घरावर मुलाने ताबा केला आहे. यात वडील आजारी असून त्यांना बायपास सर्जरीची करण्याची वेळ आली आहे. पण यासाठी लागणारा उपचराचा खर्च करण्याची त्यांची सोय नाही. मुलांकडून कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही. तसेच घरात राहून घरातील खर्चही उचलत नाही.
घरात कुठलीच मदत न करणारा हा मुलगा आई वडिलांना सन्मानजनक वागणून देणे दूरच उलट त्यांना मारहाण व शिवीगाळ करतो. त्यांना मारुन टाकण्याची धमकी देत असतो पालकांनी कंटाळुन शेवटी त्यांच्या विरोधात याचिका दाखल केली. पालकांच्या नातेवाईकांनाही तो घरी येऊ देत नाही अशी तक्रारही पीडित आई वडिलांनी याचितकेत केली होती. न्यायालयाने या मुलाला घराबाहेर काढल्याशिवाय पालकांचे मानसिक शारीरिक आरोग्य समाधान मिळू शकत नाही. यासाठी मुलाला घराबाहेर काढून
पालकांना सुरक्षित व समाधानाचे वातावरण उपलब्ध करुन देण्यासाठी मुलाला घराबाहेर काढणे काहीच चुकीचे नसल्याचे निरीक्षण नोंदवले.