महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देशाला पंतप्रधान म्हणून मोदींची गरज तितकीच खासदार म्हणून गडकरींची - सुषमा स्वराज - election

एकीकडे पंतप्रधान मोदी दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देतात दुसरीकडे काँग्रेसचे लोक त्यांच्यासोबत संवाद साधून विकल्प काढण्यास सांगतात. चौकीदार आणि राजघराण्यामध्ये हा फरक आहे, असा आरोप सुषमा स्वराज यांनी केला.

सुषमा स्वराज

By

Published : Apr 3, 2019, 11:44 AM IST

नागपूर - देशाला जितकी गरज पंतप्रधान म्हणून मोदींची आहेत, तितकीच गरज केंद्रातील महत्वाचे खासदार म्हणून गडकरींची आहे. यासाठी नितीन गडकरी यांना खासदार बनवा आणि मोदींना पंतप्रधान बनवा. त्यांची ही जोडी अशीच ठेवा असे आवाहन परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी केले. नागपुरात भाजपतर्फे आयोजित महिला संमेलनात त्या बोलत होत्या.

एकीकडे पंतप्रधान मोदी दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देतात दुसरीकडे काँग्रेसचे लोक त्यांच्यासोबत संवाद साधून विकल्प काढण्यास सांगतात. चौकीदार आणि राजघराण्यामध्ये हा फरक आहे, असा आरोप सुषमा स्वराज यांनी केला.

नितीन गडकरी यांचे कार्य संपूर्ण देशभरात आहे. रस्त्यांच्या विकासासोबत त्याच्या जल मार्गातील कार्य देखील विकासात्मक असल्याचे स्वराज म्हणाल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details