नागपूर -काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात गेलेले अमरावतीचे माजी आमदार सुनील देशमुख पुन्हा काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत. त्यानंतर आणखी काही नेते भाजपमधून काँग्रेसमध्ये परतणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसमध्ये परत येणाऱ्यांची यादी मुंबईच्या टिळक भवनात तयार होत आहे. योग्य वेळी ते सर्वांना कळेल, असे वक्तव्य पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केले आहे.
काँग्रेसमध्ये परातणाऱ्यांची यादी मुंबईच्या टिळक भवनात तयार होत आहे - सुनील केदार - Sunil Deshmukh will join the Congress
विधानसभा निवडणुकीच्या आधी इतर पक्षातून भारतीय जनता पक्षात आलेल्या नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊ लागली आहे. त्यापैकीच एक म्हणजे माजी मंत्री सुनील देशमुख यांच्याकडे बघितलं जात आहे.
भारतीय जनता पक्षात अस्वस्थता
राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होऊन आता दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होतो आहे. यादरम्यान भाजपच्या अनेक नेत्यांनी सत्तास्थापने संदर्भात अनेक मुहूर्त शोधून काढले होते. मात्र, सगळे मुहूर्त वाया गेल्याने विधानसभा निवडणुकीच्या आधी इतर पक्षातून भारतीय जनता पक्षात आलेल्या नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊ लागली आहे. त्यापैकीच एक म्हणजे माजी मंत्री सुनील देशमुख यांच्याकडे बघितलं जात आहे. उद्या ते मुंबईत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यानंतर अनेकांनी काँग्रेसमध्ये परत येण्यासाठी उत्सुकता दर्शवली असल्याची चर्चा आहे. मुंबईत येथील कार्यालयात या संदर्भात यादी तयार केली जात आहे. भाजप आमदार टेकचंद सावरकर यांना माझ्या विरोधात हक्क भंग आणायचा असेल तर त्यांनी तो आणावा असं देखील केदार म्हणाले.
शेतकऱ्यांना मदतीची आमची भूमिका-
महाविकास आघाडी सरकारने नेहमीच शेतकऱ्यांना मदतीची भूमिका घेतली आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात घेतलेली भूमिका आणि मदत सर्वांना बघायला मिळत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे पुढेही शेतकऱ्यांना नुकसान होत असेल तर महाविकास आघाडी अतिरिक्त दूध खरेदी करायला तयार आहे. गेल्या वर्षी 10 लाख लिटर दुध सरकारने खरेदी केले होते. आमची शेतकऱ्यांना मदत करायची तयारी असल्याचे केदार म्हणाले आहेत.