नागपूर -राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नागपूर आणि भंडाऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या. नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांची तातडीने बदली करण्यात आली आहे. निवडणूक अयोगाच्या आदेशानुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत.
विदर्भातील जिल्हाधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या - Nagpur District collector News
नागपूर आणि भंडाऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या. निवडणूक अयोगाच्या आदेशानुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत.
अश्विन मुदगल
हेही वाचा - अमरावती : ऑक्सीजन पार्कजवळ धावती कार पेटली
नागपूर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्याकडे जिल्हाधिकारी पदाचा पदभार देण्यात आला आहे. अश्विन मुदगल यांची विभागीय सहआयुक्त पदी नियुक्ती झाली.