नागपूर :मोकाट श्वानांना रस्त्यावर खाऊ घालण्याचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यानंतर आता नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये मोकाट श्वानांना रस्त्यावर अन्न खाऊ घालणाऱ्या सर्व इच्छुक नागरिकांनी प्राणीप्रेमी संस्था आणि संघटनांनी नागपूर महानगरपालिकेकडे अर्ज सादर (fixing places for feeding street dogs in Nagpur) करावे, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले (application to municipality In Nagpur) आहे.
सविस्तर माहिती :मोकाट श्वानांना ज्या ठिकाणी अन्न खाऊ घालत (Feeding Street Dogs) आहे. त्या ठिकाणाबाबत सविस्तर माहिती, अन्न खाऊ घालण्याची वेळ, अन्न खाऊ घालत असलेल्या मोकाट श्वानांची अंदाजित संख्या इत्यादी सविस्तर माहिती अर्जामध्ये नमूद करावी, अशी सूचना मनपा उपायुक्त तथा घनकचरा विभागाचे संचालक गजेंद्र महल्ले यांनी केली आहे. मोकाट श्वानांना अन्न खाऊ घालणारे नागरिक तथा प्राणी प्रेमी संस्था आणि संघटनांनी पशु वैद्यकीय सेवा कक्ष, घनकचरा व्यवस्थापन विभाग, पाचवा माळा,नागपूर महानगरपालिका, सिव्हिल लाईन्स येथे अर्ज (application for feeding street dogs) करावा.
ठिकाणे निश्चित :प्राणी प्रेमींनी 15 दिवसांच्या आत संबंधितांनी मोकाट श्वानांना अन्न खाऊ घालत असलेल्या ठिकाणाबाबतची माहिती विभागाला सादर करावी. या माहितीच्या आधारे सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेल्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिका हद्दीमध्ये मोकाट श्वानांना अन्न खाऊ घालण्याची ठिकाणे आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून निश्चित करण्यात येईल, असेही डॉ. महल्ले यांनी (submission of application to municipality) सांगितले.
उच्च न्यायालयाच्या निरीक्षणाला स्थगिती :नागपुरातील भटक्या कुत्र्यांना सार्वजनिकरित्या खायला देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. आणि सामान्यांसाठी नियुक्त केलेल्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खायला देण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश नागपूर महापालिकेला दिले. भटक्या कुत्र्यांना खायला घालण्यात आणि त्यांचे संरक्षण करण्यात स्वारस्य असलेल्या लोकांनी त्यांना दत्तक घेऊन घरी नेले पाहिजे किंवा त्यांच्या देखभालीचा खर्च उचलावा, या उच्च न्यायालयाच्या निरीक्षणालाही सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.