महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

श्रद्धानंद अनाथालयातील विद्यार्थिनींच्या निश्चयाची 'गुढी' - नागपूर रेडिमेड गुढी

बदलत्या काळानुसार आता पारंपरिक गुढी देखील नव्या रूपात आणि स्वरुपात उपलब्ध होऊ लागल्या आहेत. लोकांकडे वेळ नसल्याने आता तयार असलेल्या गुढींची मागणी वाढली आहे. या संधीचे सोने करण्याच्या उद्देशाने नागपुरातील श्रद्धानंदपेठ येथील श्रद्धानंद अनाथालयातील सुमारे २० विद्यार्थिनींनी 'पोर्टेबल गुढी' तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

नागपूर
नागपूर

By

Published : Apr 6, 2021, 9:11 PM IST

Updated : Apr 6, 2021, 9:57 PM IST

नागपूर- मांगल्याचे प्रतीक म्हणून गुढीपाडव्याला राज्यातील प्रत्येक मराठी घरात गुढी उभारली जाते. चैत्र महिन्याची सुरुवात ज्या दिवसाने होते, तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. मराठी नवीन वर्ष म्हणून देखील गुढीपाडव हा सण साजरा केला जातो. बदलत्या काळानुसार आता पारंपरिक गुढी देखील नव्या रूपात आणि स्वरुपात उपलब्ध होऊ लागल्या आहेत. लोकांकडे वेळ नसल्याने आता तयार असलेल्या गुढींची मागणी वाढली आहे. या संधीचे सोने करण्याच्या उद्देशाने नागपुरातील श्रद्धानंदपेठ येथील श्रद्धानंद अनाथालयातील सुमारे २० विद्यार्थिनींनी 'पोर्टेबल गुढी' तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या विद्यार्थिनींचे हात सध्या अतिशय सुबक आणि आकर्षक गुढ्या तयार करण्यात मग्न झाले आहेत. दिवसातील काही तास या विद्यार्थ्यांनी गुढी तयार करतात, ज्यातून मिळालेले उत्पन्न श्रद्धानंद अनाथलय प्रशासन या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करतात. त्यामुळे भविष्यात या विद्यार्थ्यांकडे स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा निधीची कमतरता भासू नये, हा या मागचा उद्देश आहे.

नागपूर

गेल्या वर्षी आलेल्या कोरोना संकटामुळे गुढीपाडवा सह सर्वच सणांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. यावर्षी देखील कोरोनाचे संकट कायम असल्याने यंदाची गुडीकशी उभारायची हा प्रश्न आहेच. मात्र यावर उपाय शोधून काढलाय श्रद्धानंद अनाथलयाने. मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये अश्या प्रकारच्या छोट्या गुडीची मागणी फार मोठी आहे.

दीडशे गुढींची ऑनलाइन विक्री

नागपूरच्या श्रद्धानंद अनाथालयात सध्या गुढी तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. अनाथालयातील मुली गेल्या काही दिवसांपासून गुढी तयार करण्याच्या कामात व्यग्र आहेत. खाली लाकडी छोटा स्टॅन्ड, त्यावर बारा इंची गुढी तयार करण्यात येत आहे. लाल, हिरवा आणि केशरी रंगात या गुढी तयार केल्या जात आहेत. त्यातही हिरव्या आणि केशरी रंगाच्या गुढीला विशेष मागणी आहे. आतापर्यंत या मुलींनी तयार केलेल्या सुमारे दीडशे गुढींची ऑनलाइन पद्धतीने विक्री केली जाते आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारताच्या विविध शहरातून या गुढींची मागणी वाढली आहे. गुढीपाडव्याला आणखी काही दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये सुमारे ५०० गुढींची ऑनलाइन विक्री करण्याचा मानस या विद्यार्थिनींचा आहे

शाळा बंद मात्र कौशल्य विकास सुरू

गुढीपाडव्याचा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. मात्र, सलग दुसऱ्या वर्षी गुढीपाडव्याच्या उत्साहावर कोरोनाचे सावट आहे. कोरोनाच्या या संकटकाळात शाळा बंद आहेत. त्यामुळे श्रद्धानंद अनाथालयात राहणाऱ्या विद्यार्थिनींमध्ये कौशल्य विकास व्हावा, यासाठी अनाथालयाकडून विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. त्यापैकीच एक उपक्रम म्हणजे गुढी तयार करणे आहे. गेल्या पाच वर्षांपासून येथील विद्यार्थी-विद्यार्थिनी गुढी तयार करतात. या गुढींना मुंबई, पुणे, गोवा, अहमदाबाद यासारख्या शहरांमधू मोठी मागणी आहे.

Last Updated : Apr 6, 2021, 9:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details