नागपूर - कोरोनाचा प्रादुर्भाव टाळून बचावासाठी विविध ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अनेक शासकीय कार्यालयात निर्जंतुकीकरण करण्यासाठी यंत्रे बसवण्यात येत आहेत. अशात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसमध्येही निर्जंतुकीकरण करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागपूर विभागीय मंडळातर्फे येणाऱ्या हिंगणा येथील एसटीच्या कार्यशाळेत ही बस तयार करण्यात आली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांसाठी बसमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळून बचावासाठी विविध ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अनेक शासकीय कार्यालयात निर्जंतुकीकरण करण्यासाठी यंत्रे बसवण्यात येत आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांसाठी बसमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था
बसमध्ये 15 ते 20 सेकंद फिरल्यावर व्यक्तीचे निर्जंतुकीकरण करता येते. 44 आसन क्षमता असलेल्या बसला एकच दार असून, बसच्या आत निर्जंतुकीकरण यंत्रणा लावण्यात आली आहे. संचारबंदीमुळे सध्या एसटीची वाहतूक बंद असल्याने कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत असणाऱ्या डॉक्टर आणि पोलिसांसाठीही बस वापरण्यात येणार आहे.