महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 5, 2023, 8:52 AM IST

Updated : Apr 5, 2023, 10:03 AM IST

ETV Bharat / state

Nagpura Suicide case: 24 तासामध्ये दोन आत्महत्या; फेसबुक लाईव्ह करत तरुणाची तर जवानाची क्वार्टरमध्ये आत्महत्या

जिल्ह्यात आत्महत्यांच्या दोन घटना घडल्या आहेत. राज्य राखीव पाेलिस दलातील (एसआरपीएफ) शिपायाने क्वार्टरमध्ये आत्महत्या केल्याची घटना हिंगणा परिसरातील एसआरपीएफ कॅम्प येथे समोवारी सायंकाळी घडली. मानसिक आजार असल्याने त्यांच्यावर औषधाेपचार सुरू हाेते. तर फेसबुक लाईव्ह करीत एका विवाहित तरुणाने आत्महत्या केली आहे.

Nagpura Suicide case
जिल्ह्यात 24 तासामध्ये घडल्या दोन आत्महत्याच्या घटना

नागपूर: जिल्ह्यात आत्महत्यांची भयावह मालिका सुरुच आहे. मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या शिपायाने क्वार्टरमध्ये एकटे असताना आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या शिपायाचे प्रशांत रामेश्वर कंगाले (28) नाव आहे. मानसिक आजाराने त्रस्त असल्यामुळे आत्महत्या करीत असल्याची सुसाईड नोट लिहून प्रशांत रामेश्वर कंगाले यांनी हिंगणा येथील एसआरपीएफच्या क्वार्टरमध्ये आत्महत्या केली.


मानसिक आजार जडला होता: प्रशांत कंगाले हे २०१४ पासून राज्य राखीव पोलीस दल (गट-४) मध्ये शिपाई या पदावर कार्यरत होते. गेल्या काही महिन्यापासून त्यांना मानसिक आजारी जडला होता. औषधोपचार सुरू असल्याने त्यांना स्थानिक कंपनीमध्ये पोस्टिंग देण्यात आली होती. एसआरपीएफ परिसरात असलेल्या मंदिरात ते देखभाल करण्याचे काम करायचे. सोमवारी सायंकाळी ५:३० वाजता नित्यनियमाने त्यांनी मंदिराचे दार उघडले नाही म्हणून त्यांचे सहकारी त्याला संपर्क करत होते. मात्र ते फोन घेत नसल्याने, सहायक फौजदार विजय नेवारे आणि काही सहकारी त्याला शोधण्यासाठी त्याच्या क्वार्टरकडे गेले. त्यांनी बाहेरून आवाज दिला. मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दार उघडे असल्याने त्यांनी आतमध्ये जाऊन बघितले तर प्रशांतचा मृतदेह त्यांना दिसला. त्यांनी याबाबत वरिष्ठांना कळविले तसेच एमआयडीसी पोलिसांना सुद्धा सूचना देण्यात आली.



आत्महत्या करण्यापुर्वी लिहली सुसाईड नोट: घटनेची माहिती समजताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्रशांत यांचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता. एमआयडीसी पोलीसानी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठविला. एसआरपीएफ गट ४ मधील उपनिरीक्षक सुनील कळस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आकस्मिक घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. तसेच आत्महत्या करण्यापूर्वी प्रशांत कंगाले यांनी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना मिळाली आहे. त्यात मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे त्यात नमूद केल्याची माहिती आहे. प्रशांत अविवाहित होते. त्यामुळे क्वार्टरमध्ये एकटाच राहत होते, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

फेसबुक लाईव्ह करून आत्महत्या: फेसबुक लाईव्ह करीत एका विवाहित तरुणाने आत्महत्या केली आहे. नागपूर जिल्ह्याच्या कामठी तालुक्यात ही घटना घडली असून कृतांक डोंगरे (२७) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. कृतांकची पत्नी माहेरी गेली होती. चार एप्रिलच्या मध्यरात्री नंतर घरी कोणी नसताना कृतांकने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी कृतांकने पत्नीच्या फेसबुक अकाऊंटवरून लाईव्ह केले होते. सकाळी आत्महत्येची घटना उघडकीस आली. मी स्वतःच्या मर्जीने आत्महत्या करीत असल्याची फेसबुक लाईव्ह पोस्टमध्ये त्याने म्हटले आहे. मध्यरात्रीची वेळ असल्याने कुणालाही प्रकार लक्षात आला नाही. मात्र सकाळी फेसबुकची पोस्ट बघून त्याच्या घरी धाव घेतली असता कृतांकचा मृत्यू झाला होता.



कौटुंबिक वाद तर नाही:कृतांकने डोंगरेने आत्महत्या का केली असावी या संदर्भात कामठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून आत्महत्या करण्यामुळे कौटुंबिक वाद तर नाही याचा देखील तपास पोलीस केला जात आहेत.

हेही वाचा: Nagpur Crime अनैतिक संबंधांनी घेतला दोन महिलांचा जीव दोघांना अटक

Last Updated : Apr 5, 2023, 10:03 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details