नागपूर - हुडकेश्वर भागातील विघ्नहर्ता नगर येथे एका मुलाने स्वतःच्या वडिलांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. तसेच आरोपीने वडिलांचे गुप्तांग कापल्याची माहिती उघडकीस आलीय. विजय पिल्लेवान(वय-५५ वर्षे) असे मृताचे नाव आहे. 25 वर्षाचा स्वत:चा मुलगाच त्यांचा कर्दनकाळ ठरलाय. संबंधित आरोपीने घरगुती कारणातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती माहिती मिळत असून त्याला अटक करण्यात आली आहे.
नागपुरात घरगुती कारणावरून बापाची हत्या; गुप्तांग कापले
हुडकेश्वर भागातील विघ्नहर्ता नगर येथे एका मुलाने स्वतःच्या वडिलांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने वडिलांचे गुप्तांग कापल्याची माहिती उघडकीस आलीय.
पोलीस निरीक्षक कमल वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विक्रांत पिल्लेवान बॉडी बिल्डर आहे. त्याला स्टेरॉईफ आणि प्रोटीन घेण्याची सवय होती. दोन दिवसांपूर्वी किरकोळ कारावरून वाद झाल्याने त्याची मारामारी झाली होती. यामध्ये त्याच्या डोक्याला मार लागला.
मित्रांनी काल त्याचे सिटी स्कॅन करून घेतले होते. यामध्ये रिपोर्ट्स नॉर्मल आल्याची माहिती मिळत आहे. आज सकाळी घरातील सर्व मंडळी टीव्ही बघत असताना विक्रांत अचानक हिंसक झाला. वडिलांना शिवीगाळ करत त्याने मारहाण करायला सुरुवात केली. यानंतर त्याने वडिलांचे गुप्तांग तोडून खाण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावरच न थांबता त्याने वडिलांचा गळ्याला फाडून ते मांस देखील खाण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी विक्रांतला अटक केली असून या प्रकारचे कृत्य करण्यामागील कारणांचा शोध सुरू आहे.