नागपूर- काँग्रेसतर्फे लॉकडाऊनमध्ये गरीब व गरजूंना मदत देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाला. नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यामधील मांढळ या गावात जीवनाश्यक वस्तूंच्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
काँग्रेसच्या जीवनाश्यक वस्तूंच्या वाटपावेळी सोशल डिस्टन्सिंगचा 'फज्जा' - सोशल डिस्टन्सिंग
गुरुवारी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे गरीब व गरजूंना अन्यधान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गरजूंची गर्दी उसळल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.
गुरुवारी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे गरीब व गरजूंना अन्यधान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. काँग्रेसतर्फे आयोजित या कार्यक्रमात ग्रामीण काँग्रेसचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. मांढळ येथील जुना बाजार चौकात आयोजित कार्यक्रमात ग्रामस्थांची मोठी गर्दी उसळली. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करा असे सांगणारे फलक देखील नव्हते. त्यामुळे मदत वाटप कार्यक्रमात होणारी ही गर्दी कोरोना संसर्गाला निमंत्रण देणारी ठरत असल्याचे म्हटले जात आहे.
लॉकडाऊनच्या या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळायचा असेल, तर अशा प्रकारे गरीब व गरजूंना मदत करताना देखील नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.