नागपूर- राज्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. नागपुरातील कोरोना बाधितांची संख्या चार झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने शहरात कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू केली आहे. मात्र, प्रसासनाकडूनच त्याची अबंलबजावणी होताना दिसत नाही. गर्दीच्या ठिकाणी रस्त्याच्या लगत असलेली दुकाने, हाॅटेल्स, बार, रेस्टाॅरंट पुढील काही दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार आज सीताबर्डी बाजार वगळता सर्वत्र शुकशुकाट आहे. मात्र, सीताबर्डी बाजार असोसिएशनला दुकाने बंद करण्याचा कोणताही आदेश मिळाला नसल्याचे येथील व्यापारी सांगत आहेत.
सीताबर्डीला भय ना कोरोनाचे, ना प्रशासनाचे; कलम १४४चे उल्लंघन करत सजला बाजार - कोरोना अपडेत नागपूर
सीताबर्डी बाजारात सर्व दुकाने सर्रास सुरू आहेत. पोलिसांच्या गाड्या याठिकाणी गस्त घातल आहेत. मात्र, त्यांच्याकडूनही येथील दुकाने बंद करण्यात आले नाहीत. येथील दुकानदारांशी संपर्क साधला असता, आम्हाला दुकाने बंद करण्याचे कोणतेही आदेश मिळाले नाहीत. त्यामुळे आम्ही दररोजप्रमाणे दुकाने लावली आहेत, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा-कोरोना : 31 मार्चपर्यंत मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा बंद
सीताबर्डी बाजारात सर्व दुकाने सर्रास सुरू आहेत. पोलिसांच्या गाड्या याठिकाणी गस्त घातल आहेत. मात्र, त्यांच्याकडूनही येथील दुकाने बंद करण्यात आले नाहीत. येथील दुकानदारांशी संपर्क साधला असता, आम्हाला दुकाने बंद करण्याचे कोणतेही आदेश मिळाले नाहीत. त्यामुळे आम्ही दररोजप्रमाणे दुकाने लावली आहेत, असे त्यांनी सांगितले. प्रशासनातील अधिकाऱ्यांनीच याठिकाणी दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात कामचुकारपणा केला. त्यामुळे या बाजारात दुकाने थाटली असून गर्दी वाढली आहे.