महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर : निवडणूक प्रशिक्षणाला अनुपस्थित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस - notice

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता आहे. तसेच अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध होणे गरजेचे असल्यामुळे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांची नियुक्ती निवडणूक कामाकरता करण्यात आली आहे.

मतदान यंत्र

By

Published : Mar 26, 2019, 12:47 PM IST

नागपूर - लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागपूर आणि रामटेक मतदारसंघातील मतदानासाठी पहिल्या प्रशिक्षणाची सुरुवात झाली आहे. या प्रशिक्षणाला अनुपस्थित असलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुद्गल यांनी दिले आहेत

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लोकसभा निवडणुकीसंदर्भात विविध विभागांचा आढावा जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी घेतला. निवडणुकीच्या पहिल्या प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आल्यामुळे सर्व कर्मचार्‍यांविरुद्ध तात्काळ कारवाई करावी असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुद्गल यांनी दिले आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता आहे. तसेच अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध होणे गरजेचे असल्यामुळे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांची नियुक्ती निवडणूक कामाकरता करण्यात आली आहे. त्याकरिता पहिले प्रशिक्षण अनिवार्य असून प्रशिक्षणार्थी मोठ्या प्रमाणात कर्मचारी गैरहजर असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना नोटीस देण्याच्या सूचना निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुद्गल यांनी घेतला आहे.

नागपूर जिल्ह्यातील मतदान केंद्रनिहाय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सुमारे २१ हजार ९१२ अधिकारी व कर्मचारी तसेच आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details