महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिव राज्याभिषेकानिमित्त नागपुरात ढोल-ताशांचे सादरीकरण - विदर्भ

शिवराज्याभिषेकानिमीत्त नागपुरात विशेष आयोजन करण्यात आले होते. यावेळी विदर्भातील सहा जिल्ह्यातून आलेल्या ढोल- ताशा पथकांनी एकाच वेळी सादरीकरण केले.

शिव राज्याभिषेकानिमित्त नागपुरात ढोल-ताशांचे सादरीकरण

By

Published : Jun 17, 2019, 12:00 AM IST

नागपुर -छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानिमित्त नागपुरातील सर्व वातावरण शिवमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे मुख्य आकर्षण ढोल ताशा पथक होते. यावेळी विदर्भातील सहा जिल्ह्यातून आलेल्या पथकांनी एकाच वेळी लय आणि तालबद्धपणे सुरेल सादरीकरण करून शिवकालीन इतिहासाला उजाळा दिला.

शिवराज्याभिषेकानिमीत्त ढोल-ताशांनी परिसर दुमदुमला


छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानिमित्य नागपुरात विशेष तयारी करण्यात आली होती. विविध ठिकाणी रांगोळ्य़ा काढून मावळ्यांनी महाराजांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्याच बरोबर विदर्भातील 6 जिल्ह्यातील ढोल- ताशा पथकांनी एकाच वेळी लय आणि तालबद्धपणे सादरीकरण करत संपूर्ण वातावरण शिवमय करून टाकले. विशेषतः नागपुरातील तरुणाई ढोल- ताशा पथकांचे संयुक्त सादरीकरण बघण्यासाठी उत्साही होती.

शिव राज्याभिषेकानिमित्त नागपुरात ढोल-ताशांचे सादरीकरण

ABOUT THE AUTHOR

...view details