नागपूर - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प भविष्यासाठी दिशादर्शक आहे. मात्र, निर्धारित लक्ष गाठणे अत्यंत कठीण असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ श्रीनिवास खांदेवाले यांनी दिली आहे.
२०२५ पर्यंत निर्धारीत लक्ष गाठणे कठीण - श्रीनिवास खांदेवाले
अर्थसंकल्पाकडे देशात असलेली मंदीसदृश्य परिस्थितीवर मात मिळवण्याच्या दृष्टीकोनातून देखील बघता येईल, असे खांदेवाले म्हणाले.
येत्या २०१४-२५ सालापर्यंत भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर करण्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. मात्र, हे करायचे असले तर आर्थिक विकास दर १४ टक्के असावा लागणार आहे. आज भारताचा विकास दर ७ टक्के आहे. विकास दर वाढवण्यासाठी येत्या ५ वर्षात दुपटीने प्रयत्न करावे लागेल. हे कठीण असले तरी अशक्य नाही, असे खांदेवाले म्हणाले.
अर्थसंकल्पाकडे देशात असलेली मंदीसदृश्य परिस्थितीवर मात मिळवण्याच्या दृष्टीकोनातून देखील बघता येईल, असे खांदेवाले म्हणाले.