नागपूर- शहरातील प्रसिद्ध एम्प्रेस शॉपिंग मॉल अंमलबजावणी निदेशालयाने (ईडी ) जप्त केला आहे. बँकेची ४८३ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. इम्प्रेस मॉल के. एस. एल अँड इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या मालकीचा असून या मॉलवर मंगळवारी जप्तीची कारवाई करण्यात आली. ही कारवाई केल्यामुळे मॉलमधील व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
नागपूरमधील एम्प्रेस शॉपिंग मॉलवर ईडीची कारवाई, बँकेची ४८३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा ठपका - ईडी
शहरातील प्रसिद्ध एम्प्रेस शॉपिंग मॉल अंमलबजावणी निदेशालयाने (ईडी ) जप्त केला आहे. बँकेची ४८३ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
नागपूर शहराच्या केंद्रस्थानी असलेल्या एम्प्रेस शॉपिंग मॉलमध्ये नामांकित कंपनीचे शेकडो शॉपिंग सेंटर आहेत. एवढेच नाही, तर विविध सिनेमा थिएटरदेखील या मॉलमध्ये आहेत. दिवसभर हजारो ग्राहकांची या ठिकाणी वर्दळ असते. जप्त करण्यात आलेल्या एम्प्रेस मॉलची किंमत सुमारे ४८३ कोटी रुपये असल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. ईडीने जप्तीचीही कारवाई आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायद्यांतर्गत (पीएमएलए) केली आहे.
दोन राष्ट्रीयकृत बँकांचे ५२४ कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याप्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या ३ गुन्ह्यांच्या तपासाला सुरुवात केली आहे. यातील के.एस.एल अँड इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचीही या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरू आहे.