नागपूर - कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता शासनाच्या सर्व कार्यालय, रुग्णालय आणि इतर ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून थर्मल स्क्रिनिंग केली जात आहे. नागपूर शहरातील सुपर स्पेशालीटी रुग्णालयात आज आलेल्या रुग्णांना आत सोडण्यापूर्वी त्यांची आवश्यक सर्व विचारपूस केली जात आहे. त्यानंतर कोणात कोरोनाची लक्षण आहेत का याचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना बराच वेळ तळपत्या उन्हात उभं राहावं लागलं.
भर उन्हात रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची स्क्रिनिंग - high temperature in nagpur
रोनाचा वाढता धोका लक्षात घेता शासनाच्या सर्व कार्यालय, रुग्णालय आणि इतर ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून थर्मल स्क्रिनिंग केली जात आहे. नागपूर शहरातील सुपर स्पेशालीटी रुग्णालयातही रुग्णांची स्क्रिनिंग केली जात आहे. त्यामुळे रुग्णांनाबराच वेळ तळपत्या उन्हात उभं राहावं लागलं.
भर उन्हात रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची स्क्रिनिंग
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दर दिवसाला सुमारे 1 हजार रुग्ण विविध आजारांवरील उपचारासाठी येत असतात. इथे येणाऱ्या रुग्णांमध्ये मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील रुग्णांना देखील समावेश आहे. आज उपचारासाठी किंवा भर्ती असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची थर्मल स्क्रिनिंग करण्यात आली. ज्यामुळे रुग्णालयाच्या आत जाणाऱ्यांची भली मोठी रांग लागल्याचे चित्र बघायला मिळाले. सध्या नागपुरात सूर्य चांगलाच तापला असल्याने अनेकांना याचा प्रचंड त्रास झाला.