नागपूर- शेख अब्दुला यांनी स्वतः आपल्या आत्मकथेमध्ये म्हटले आहे, की त्यांचे पूर्वज हिंदू होते. त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील हिंदू आणि मुस्लीम परिवारांचे पूर्वज एक होते, असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारक अरुण कुमार यांनी व्यक्त केले. शहरात जम्मू-काश्मीर स्टडी सेंटरकडून कलम ३७० पश्चात जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती या विषयावर बुधवारी व्याख्यान आयोजित केले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
जम्मू काश्मीरमधील हिंदू-मुस्लिमांचे पूर्वज एकच, संघ प्रचारकांचे वादग्रस्त वक्तव्य - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारक अरुण कुमार
जम्मू काश्मीरमधील हिंदू-मुस्लिमांचे पूर्वज एकच असल्याचे वादग्रस्त व्यक्तव्य आरएसएसचे अखिल भारतीय प्रचारक अरुण कुमार यांनी केले आहे. ते कलम ३७० वर व्याख्यान दिल्यानंतर पत्रकारांशी नागपुरात बोलत होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारक अरुण कुमार
हे वाचलं का? - सरकारने आम्हाला १०० वर्ष मागे ढकललं, पत्र पाठवायलाही जमेना; काश्मीरींचा संताप
काँग्रेसचे अनेक नेते जम्मू-काश्मीर मधील कलम ३७० हटवल्याचे समर्थन करतात. तसेच देशात कलम ३७० बाबत एकमत झाले ही एक सकारात्मक बाब आहे. यावेळी त्यांनी कलम ३७० बाबत अनेक बाबींचा खुलासा केले. तसेच ते हटवण्यामागचा उद्देश्य समजावून सांगितला.
Last Updated : Aug 29, 2019, 2:38 PM IST