महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गेल्या तीन वर्षात राज्यात रस्ते अपघातात घट ! मृतांचा दरातही घट - राज्य महामार्ग पोलिस

गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रातील अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. राज्य महामार्ग पोलिसांच्या इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमच्या मदतीने अतिवेगवान वाहनांची देखरेख करण्यासंदर्भात पावलं उचलली गेली आहेत. मागील वर्षीच्या आकडेवारीनुसार रस्ते अपघातांचे प्रमाण 8.47 टक्के कमी झाले आहे तर मृतांचा दरही 3.56 टक्के इतका आहे.

नागपूर
road-accidents-in-maharashtra-dip-in-last-3-years

By

Published : Oct 18, 2020, 1:43 PM IST

नागपूर -गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रातील अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. राज्य महामार्ग पोलिसांच्या इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमच्या मदतीने अतिवेगवान वाहनांची देखरेख करण्यासंदर्भात पावलं उचलली गेली आहेत.

मागील वर्षीच्या आकडेवारीनुसार रस्ते अपघातांचे प्रमाण 8.47 टक्के कमी झाले आहे तर मृतांचा दरही 3.56 टक्के इतका आहे. रस्ते अपघातांची नोंद कमी झाली असून 2016 मधील रस्ते अपघातांचा आकडा 39,878 वरुन 2017 मध्ये 36,056 इतका झाला होता. तर 2018 मध्ये 35,717 तर 2019 मधील आकडा 32,925 इतका कमी झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ अपघातांचे प्रमाण देखील गेल्या तीन वर्षात कमी झाले आहे. राज्यातील 2016 मधील किरकोळ अपघातांचा आकडा 6,271 इतका होता 2019 मध्ये आकडा कमी होऊन 3,568 इतका झाला आहे. तर 2018मध्ये राज्यात 12,098 भीषण अपघात झाले असून यंदा 11,787 इतक्या अपघातांची नोंद आहे. महाराष्ट्रात 12,935 जणांचा 11,780 भीषण अपघातांमध्ये 2016 मध्ये मृत्यू झाला होता तर 12,511 जणांचा 11,454 भीषण अपघातांत मृत्यू झाला होता.

महाराष्ट्र राज्य महामार्ग पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांमुळे अपघातां प्रमाण कमी झाले आहे, असं एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसंच मुंबई-पुणे महामार्ग, पुणे, सोलापूर, अहमदनगर आणि नाशिक याठिकाणी झालेल्या अपघातांचं प्रमाण 30 टक्के इतके आहे.मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम लागूू केल्याने भीषण अपघातांचे प्रमाण कमी झाले असल्याची माहितीही त्यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details