Surgical Strike 2 : हा फक्त ट्रेलर, पिक्चर अजून बाकी - निवृत्त वायुसेना अधिकारी - operation
मंगळवारी पहाटेच्या सुमारास भारतीय वायू सेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मदच्या तळावर १ हजार किलोचा बॉम्ब फेकत बदला घेतला.
निवृत्त वायुसेनेच्या अधिकारी शिवाली देशपांडे
नागपूर- पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संताप होता. मंगळवारी पहाटेच्या सुमारास भारतीय वायू सेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मदच्या तळावर १ हजार किलोचा बॉम्ब फेकत बदला घेतला. या हवाई हल्ल्यातून भारताने दहशतवाद पसरवणाऱ्या पाकिस्तानची जिरवली, असे मत निवृत्त वायुसेनेच्या अधिकारी शिवाली देशपांडे यांनी केले. शिवाली देशपांडे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मोनिका आक्केवार यांनी....