महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्याचा पर्दाफाश; अधिकाऱ्यांचाही समावेश आल्याचा संशय - monika akkewar

गर्दीच्या हंगामात आरक्षित तिकिटाचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात चालतो. त्यावर आळा घालण्यासाठी रेल्वे पोलिसांनी नागपूर विभागात ६ ठिकाणी धाड टाकून 3 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जादा पैसे घेऊन तिकीटे मिळवून देण्याचा कुणी अमीष दाखवत असेल तर 182 क्रमांकावर संपर्क साधण्यचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आला आहे.

आरोपी आणि पोलीस पथक

By

Published : May 16, 2019, 12:05 PM IST

नागपूर - उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असते. प्रवाशांची गर्दी जास्त असल्याने आरक्षित तिकिटांचाही प्रश्न मोठ्याप्रमाणात उद्भवतो. याचा फायदा घेत दलाल प्रवाशांकडून अधिकचे पैसे उकळतात, अशा प्रकारे तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांवर दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलाने कारवाई केली आहे.

माहिती देताना विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे


जीआरपीएफच्या पथकाने नागपूर विभागात तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या इतवारी, गोंदीया, बालाघाट, छिंदवाडा, नागभीड आणि धंतोली, अशा ६ ठिकाणी धाडी टाकून ४६ काऊंटर आणि ई - तिकीटे जप्त केली आहेत. तसेच नागपूरच्या धंतोली भागातील प्रभात टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स येथून ४६ पैकी ११ चालू तिकीटे, संगणक, मोबाईल, लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त केला. पथकाने टाकलेल्या धाडीतून एकूण ३ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांनी दिली.


फेक आयडी बनवून मोठ्या प्रमाणावर रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजर केला जातो. या प्रकरणात रेल्वेच्या अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा संशय व्यक्त केले जात आहे. याप्रकारणी कसून तपासही केला जात आहे, असे आशुतोष पांडे म्हणाले. तसेच नागरिकांनी स्वतः तिकीटे काढावीत. कोणत्याही अमिषाला बळी पडू नये. काळ्या बाजारातील तिकीट खरेदी करणे टाळावी. कुणी तिकिटांसाठी जादाचे पैसे मागत असेल तर १८२ क्रमांकावर संपर्क साधून रेल्वे पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही पांडे यांनी केले आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details