नागपूर - नागपूर जिल्ह्यात आता रुग्णसंख्या सातत्याने घटली आहे. यासोबत गंभीर असलेल्या रुग्णसंख्येतही घट झाली आहे. सातत्याने घटणारी रुग्णसंख्या आणि मृत्युदर हे दिलासा देणारे ठरत आहे. यात जिल्ह्यात 710 रुग्ण सक्रिय असून केवळ 200 रुग्ण हे दवाखान्यात उपचार घेत आहे. यामुळे 510 रुग्ण घरात राहून उपचार घेत असल्याने परिस्थिती सुधारली आहे. यात रिकव्हरी रेट 97.96 म्हणजे 98 टक्क्यावर आलेला आहे.
नागपूरमध्ये रिकव्हरी रेट 98 च्या घरात; दवाखान्यात उपचार घेणारे 200 रुग्ण - nagpur corona news
शहरात 647 तर ग्रामीणमध्ये 63 रुग्ण सक्रिय आहे. आतापर्यंत 4 लाख 76 हजार 824 जण रुग्ण कोरोना बाधित झाले आहे. यातून 4 लाख 67 हजार 093 जण हे कोरोनातून बरे झाले आहे. यात आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णाची संख्या 9021 वर जाऊन पोहचली आहे. नागपूरात सध्या रिकव्हरी रेट हा 97.96 टक्के इतका आहे.
पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात 224 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. यात 66 नवीन बधितांची नोंद झाली आहे. 4 जण हे कोरोनाने दगावले आहे. तेच भंडारा, गोंदिया, गडचिरोली या तीन जिल्ह्यात शून्य मृत्यूची नोंद नाही. यात कोरोना बाधितांच्या तुलेनेत 158 अधिकचे रुग्ण हे कोरोमुक्त झाले आहे. यात नागपूरातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्या दर 0.4 टक्के, तर पूर्व विदर्भातील रुग्णसंख्येच्या दरात घसरण होऊन 0.44 इतकी झाली आहे.
हेही वाचा -पुण्यात 'सॉरी मॉम' लिहून पोलीस शिपायाने हाताची नस कापून घेतला गळफास