महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : 'येथे' उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात मोठा सिंहासनारूढ पुतळा

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगातील सर्वात मोठा सिंहासनारूढ भव्य पुतळा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महाराजबाग स्थित जागेवर उभारला जाणार आहे. विद्यापीठ शताब्दी महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती लोकसहभागातून हा भव्य पुतळा साकारणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याच्या स्थापनेबाबत माहिती पत्रक कुलगुरू डाॅ. सुभाष चौधरी यांच्या हस्ते कुलगुरू कक्षात प्रकाशित करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डाॅ. संजय दुधे, स्मारक समितीचे अध्यक्ष डाॅ. मुधोजी राजे भोसले, उपाध्यक्ष शेखर सावरबांधे उपस्थित होते.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue
छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात मोठा सिंहासनारूढ पुतळा

By

Published : May 9, 2023, 2:01 PM IST

Updated : May 9, 2023, 3:26 PM IST

नागपूर :जगात अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत. नुकताचमॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा १४ फूट उंचीचा पुतळा आला. तसेच नागपूर विद्यापीठातही शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात येणार आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्थापनेला यावर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहे. त्याचे औचित्य साधून या शताब्दी वर्षी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती लोकसहभागातून विद्यापीठाच्या महाराजबाग स्थित जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ भव्य पुतळा उभारत आहे. हा पुतळा ब्रांन्झ या धातूचा आहे. त्याची रीतसर परवानगी महाराष्ट्र शासनाच्या कला व संचालनालय विभागाने दिली आहे.

शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा : जगातील सर्वात मोठा सिंहासनारूढ असा हा पुतळा राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक भारतासह जगात मानवतावादी लोकशाही व्यवस्था निर्माण करण्याचा सर्वात पहिला यशस्वी प्रयत्न आहे. त्यामुळे राज्याभिषेकाची आठवण देणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा हा जनतेच्या मनात मानवतावादी दृष्टिकोन जागवण्यासाठी प्रेरक ठरणार आहे.



महाराजांच्या विचारांचा वारसा :छत्रपती शिवाजी महाराजांचा राजधर्म आणि त्यांची प्रजाहितवादी दृष्टी आजही प्रेरणादायी आणि लक्षवेधी ठरणारी आहे. त्यांचा आदर्श आजही महाराष्ट्रातील मनामनात कायम आहे. विद्यापीठातून शिक्षण घेऊन बाहेर निघणारा विद्यार्थी केवळ शैक्षणिक पदवी घेऊन जाणारा नसावा, तर छत्रपती शिवाजी महाराजांची कल्पकता, विजयश्री, कुशल प्रशासक, राष्ट्रप्रेम, धार्मिक सहिष्णुता, नैतिकता ही मूल्य घेऊन जाणारा असावा. केवळ याच एका उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पूर्ण पुतळा उभारण्यात येत आहे.


लोक सहभागातून पुतळा उभारणार :महाराजांचा पुतळा छत्रपती शिवाजी स्मारक समिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्रशासकीय परिसरात लोक सहभागातून उभारण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक, इतिहास संशोधक,अभ्यासक व नागरिकांना प्रगत शिक्षण केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिक्षण केंद्रांमध्ये शिक्षणतज्ञ, संशोधक, विद्यार्थी यांना शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर व कार्यावर अभ्यास करण्याची संधी प्राप्त होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची कल्पना व विचार समजून घेण्यासाठी आणि त्यावरील संशोधन अधिक प्रगल्भ करण्यासाठी स्मारक समिती साधने उपलब्ध करून देणार आहे.

शिष्यवृत्ती व संशोधन साधनांची पूर्तता : छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यामुळे भारतासह जगामध्ये सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक जीवनावरील पडलेल्या प्रभावाचे संशोधन करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे समाजातील उपेक्षित पीडित मागासवर्गीय व समाजातील दुर्बल घटकांच्या जैविक पैलूबद्दल संशोधन व अभ्यास करण्यासाठी संशोधकांना शिष्यवृत्ती व संशोधन साधनांची पूर्तता करण्यासाठी या स्मारकाचे निर्माण करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना केंद्रवर्ती ठेवून त्यांच्या कारकीर्दीच्या आधी व तद्नंतर ज्या-ज्या महापुरुषांनी संतांनी लोकनेत्यांनी कार्य केले आहे. त्याबद्दल सुद्धा संशोधन व्याख्यान परिसंवाद इत्यादी आयोजित करून त्यावर आधारित पुस्तके प्रकाशित करण्याचे कार्य स्मारक समिती करणार आहे. हा पुतळा मूर्तिकार सोनल कोहाड साकारणार आहे.

  1. हेही वाचा : Shivaji Maharaj Statue In Mauritius: मॉरिशसमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण; मॉरिशसचे पंतप्रधान आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार सोहळा
  2. हेही वाचा : Shivpremi protest : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रशासनाने हटवला; शिवप्रेमींचे ठिया आंदोलन सुरू
Last Updated : May 9, 2023, 3:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details