महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 22, 2021, 8:18 PM IST

Updated : Jan 22, 2021, 9:44 PM IST

ETV Bharat / state

राम मंदिर निर्माण कार्यातून राष्ट्र मंदिर झाले पाहिजे - राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख शांताअक्का

राम मंदिर होणे म्हणजे हा केवळ राम मंदिर निर्माणाचा प्रश्न नाही. जगातील अनेक लोकांच्या अपेक्षा आहेत की, राष्ट्रमंदिर निर्माण झाले पाहिजे. यातून रामराज्य निर्माण होईल, असे मत राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख शांताअक्का यांनी व्यक्त केले. आंध्र सोसायटीच्यावतीने आयोजित अमृत भवन नागपूर येथील कार्यक्रमात राममंदिर निर्माण कार्यासाठी निधी समर्पण कार्यक्रमादरम्यान त्या बोलत होत्या.

नागपूर
नागपूर

नागपूर- राम मंदिर होणे म्हणजे हा केवळ राम मंदिर निर्माणाचा प्रश्न नाही. जगातील अनेक लोकांच्या अपेक्षा आहेत की, राष्ट्रमंदिर निर्माण झाले पाहिजे. यातून रामराज्य निर्माण होईल, असे मत राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख शांताअक्का यांनी व्यक्त केले. आंध्र सोसायटीच्यावतीने आयोजित अमृत भवन नागपूर येथील कार्यक्रमात राममंदिर निर्माण कार्यासाठी निधी समर्पण कार्यक्रमादरम्यान त्या बोलत होत्या.

नागपूर

रामराज्य म्हणजे काय तर आत्मनिर्भर भारत, केवळ आर्थिक स्थितीने आत्मनिर्भर होणे नाही तर विचारांनी, स्वदेशी विचार, भारतीय जिवनशैलीने, तेव्हा आत्मनिर्भर होऊ. यातून रामराज्य निर्माण होईल. हा संदेश प्रभू राम आणि त्यांच्या जीवनातून मिळतो, असे शांताअक्का म्हणाल्या.

नागपूर

लाखो लोकांना प्रेरणा मिळेल
अयोध्येत राम मंदिर निर्माण होणे यासाठी म्हत्वाचे आहे, यातून हजारो लाखो लोकांना प्रेरणा मिळेल. यासाठी ते अधिक महत्त्वाचे आहे. मंदिर शब्द उच्चारताच पवित्रतेची भावना निर्माण होते. मन पवित्र होते. यात शरीर आणि मन स्वच्छ करून मंदिरात जातो. मंदिरात जाताना जी भावना असते ती भावाना ही राष्ट्र मंदिररात जाताना असली पाहिजे. रामायनातून हीच शिकवन आपल्याला मिळते. राष्ट्र मंदिर होऊ शकते जेव्हा तिथे राहणारे लोक अशाच पद्धतीने शरीर आणि मन स्वच्छ करून राहतील. हे शिकवण घेऊन ते घरोघरी जाऊन सांगायचे आहे. यात निधी नसून या कार्यासाठी समर्पण करून रामराज्य निर्माण करायला हातभार लावण्यासाठी प्रयत्न करायचे आहे, असे शांताअक्का यावेळी म्हणाल्या.
यावेळी आंध्र असोसिएशनचे अध्यक्ष आर. मुरलीधर, सचिव पी.एस.एन मूर्ती, पी.उषादेवी, जे. नागमणी या उपास्थित होत्या. एम. एस. राजू सूत्रसंचालक केले तर लक्ष्मी शास्त्री राम किर्तन गायलेले.
Last Updated : Jan 22, 2021, 9:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details