नागपूर -शिवसेनेचा माजी शहर प्रमुख खंडणीबहाद्दर मंगेश कडवची न्यायालयाने नऊ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (दि. 8 जुलै) त्याला अटक केली होती. त्याला गुरुवारी (दि. 9 जुलै) न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्याला नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
खंडणीबहाद्दर मंगेश कडवची नऊ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी - nagpur shivsena crime news
शिवसेनेचा माजी शहर प्रमुख खंडणीबहाद्दर मंगेश कडव याला न्यायालयाने नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कडव हा शिवसेनेचा शहर प्रमुख असताना त्याच्याविरोधात धमकावणे, खंडणी मागणी, फसवणूक करणे, अशा प्रकारचे अनेक गुन्हे नागपूर शहरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांची शिवसेनेच्या शहर प्रमुख पदावरुन व पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. बचावाचा कोणताच मार्ग दिसत नसल्याने तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याला नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी रात्री पांढराबोडी परिसरातून अटक केली होती. अटकेनंतर त्याला गुरुवारी न्यायालयात दोषारोपपत्र सादर करत हजर करण्यात आले होते. त्यानंतर न्यायाधीशांनी त्याला नऊ दिवासांची पोलीस कोठडी सुनावली. या काळात पोलिसांकडून बऱ्याच प्रकरणांची कडव याची चौकशी करण्यात येणार आहे. कडव याने जमलेली कोट्यवधींच्या मायेची चौकशीही या काळात होणार आहे.
हेही वाचा -आयुक्त तुकाराम मुंढेंना उच्च न्यायालयाकडून नोटीस; १५ दिवसात उत्तर देण्याचे दिले आदेश