महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रामटेक लोकसभाः कोट्यधीश असलेले उमेदवार, वाचा किती आहे संपत्ती - कृपाल तुमाने

रामटेक लोकसभा मतदारसंघातील भाजप-सेना युतीचे उमेदवार आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दोघेही कोट्यधीश आहेत.

रामटेक लोकसभा

By

Published : Mar 26, 2019, 8:12 PM IST

नागपूर - रामटेक लोकसभा मतदारसंघातील भाजप-सेना युतीचे उमेदवार आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दोघेही कोट्यधीश आहेत. यामुळे यंदाची निवडणूक कोट्यधीश संपत्तीचे मालक असलेल्या उमेदवारांमध्ये होणार आहे. या मतदारसंघातून युतीकडून कृपाल तुमाने आणि आघाडीकडून किशोर गजभिये निवडणूकीच्या रिंगणात आहेत.


कृपाल तुमाने ( शिवसेना)
कृपाल तुमाने हे रामटेक मतदार संघातील भाजप-सेना युतीचे उमेदवार आहेत. त्यांनी विज्ञान शाखेतून पदवी (बीएससी) घेतली आहे. सद्यस्थितीत त्यांच्याकडे कुटूंबासह चलसंपत्ती ७० लाख ४१ हजार १६५ इतकी आहे. तर सहकुटुंबासह अचल संपत्ती ८ कोटी ८५ लाख ६२ हजार इतकी आहे. तुमानेच्या चल संपत्तीमध्ये ३७ लाख ५४ हजार ३७३ रुपये बँक डिपॉसीट आहेत तर १७ लाख ३५ हजार ७९२ रूपयांची गुंतवणूक आहे. ११ लाख ५० हजारांच्या गाड्या आणि ३ लाख रुपयांचा दागिन्यांचा समावेश आहे.


अचल संपत्तीमध्ये हिंगणा लाडगाव, नवेगाव मौदा आणि पारडी या ठिकाणी शेतजमिनी आहेत. ज्याचे बाजार मूल्य ५ कोटी २८ लाख ६२ हजार इतकी आहे. या व्यतिरिक्त शहरातील वाघधरा, नवी शुक्रवारी आणि सक्करदार परिसरात बिगर शेतजमीन आहे. शहरातील सोमलवाडा येथे १ कोटी ६० लाख किंमतीची तर सक्करदरा येथे १ कोटी १० लाख रुपये किंमतीची इमारत आहे.


किशोर गजभिये (काँग्रेस)
रामटेक मतदार संघातून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार किशोर जगभिये हे आहेत. त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी कला शाखेतून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. गजभिये हे जिल्हाधिकारी देखील होते. गजभिये यांच्या कुटुंबाच्या नावे ३५ लाख ७० हजार ४२४ रुपयांची चल संपत्ती आहे. तर सव्वासात कोटींहून अधिक मूल्य असलेली अचल संपत्ती आहे. शपथपत्रातील माहितीनुसार गाजभिये आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे ३५ लाख ७० हजार ४२४ रुपयांची चल संपत्ती आहे. यामध्ये २ लाख ९० हजार रुपयांचे बँक डिपॉसीट, ४ लाख ४२ हजार रुपयांची गुंतवणूक, २३ लाख ५० हजार रुपय किंमतीची वाहने आणि ४.५० लाख रुपयांच्या किमतीच्या दागिन्याचा समावेश आहे.


अचल संपत्तीमध्ये रोहनखेडा आणि बेझनबाग या ठिकाणी त्यांची शेतजमीन आहे. ज्याची बाजार मूल्य किंमत १ कोटी ८ लाख इतकी आहे. तसेच त्यांच्या मालकीचे केरळ आणि मुंबईतील बांद्रा येथे फ्लॅट्स आहेत. ज्याची किंमत ६ कोटी २२ लाख इतकी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details