नागपूर- नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासंदर्भात जनतेच्या मनात संभ्रम आहे. हा संभ्रम दुर करण्याच्या दृष्टीने आणि या कायद्याबद्दल जनजागृती निर्माण करण्याकरिता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर शहरातील मुस्लीम बहुल भागात भेट दिली. त्यांनी येथील मोहन नगरमधील नागरिकांच्या भेटी घेतल्या असता, अचानकपणे खुद्द नितीन गडकरीच आपल्या घरी आल्याचे पाहून अनेक रहिवासी आवाक झाले.
आमचा गडकरींवर विश्वास.. सीएए संदर्भांत नागपुरातील मुस्लीम समाजाची भीती संपली - मोहन नगर नागपूर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुस्लीम बांधवांच्या घरी जाऊन त्यांना नागरिकत्व दुरुस्ती कायद्यातील बारकावे समजून सांगितले. त्यामुळे या कायद्याविषयी समाजामध्ये असलेला नकारात्मक दृष्टिकोन आता सकारात्मक झाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुस्लीम बांधवांच्या घरी जाऊन त्यांना नागरिकत्व दुरुस्ती कायद्यातील बारकावे समजून सांगितले. त्यामुळे या कायद्या विषयी समाजामध्ये असलेला नकारात्मक दृष्टिकोन आता सकारात्मक झाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली. तसेच गडकरी जे बोलतात ते करून दाखवतात म्हणून त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास असल्याने आता सीएए संदर्भांत आम्हाला कुठलीही भीती राहिलेली नसल्याचेही येथील नागरिकांनी सांगितले.
गडकरींनी भेट दिल्यानंतर येथील नागरिंकासोबत आमचे प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी खास बातचीत करून त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नागरिकांनी या प्रतिक्रिया दिल्या.