महाराष्ट्र

maharashtra

जनआंदोलनातर्फे नागपुरात ईव्हीएमविरोधात जनजागृती, राज्यकर्त्यांनी लोकशाही धोक्यात आणल्याचा आरोप

By

Published : Aug 27, 2019, 9:31 AM IST

नागपुरात ईव्हीएमविरोधात जनजागृती करण्यात आली. तसेच यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत तत्कालीन आणि वर्तमान सरकारांवर आरोपांची सरबत्ती करण्यात आली. तसेच आंदोलकांनी 'ईव्हीएम हटाओ देश बचाओ'च्या घोषणा दिल्या.

जनआंदोलनातर्फे नागपुरात ईव्हीएमविरोधात जनजागृती, राज्यकर्त्यांनी लोकशाही धोक्यात आणल्याचा आरोप

नागपूर -जनआंदोलनाच्यावतीने २३ ते ३१ ऑगस्ट दरम्यान राज्यभरातील सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये ईव्हीएम विरोधात जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. शहरात जनजागृती केल्यानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ईव्हीएमचा दुरुपयोग करून राज्यकर्त्यांनी देशाची लोकशाहीच धोक्यात आणली असल्याची टीका करण्यात आली.

जनआंदोलनातर्फे नागपुरात ईव्हीएमविरोधात जनजागृती, राज्यकर्त्यांनी लोकशाही धोक्यात आणल्याचा आरोप

लोकसभा निवडणुकीच्यापूर्वीच देशातील सर्वच प्रमुख पक्षांनी ईव्हीएम विरोधात आंदोलन उभे केले होते. त्यानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमत मिळवत केंद्रात सत्ता स्थापन केली. मात्र, पुन्हा राज ठाकरे यांनी ममता बॅनर्जी, सोनिया गांधी यांची भेट घेऊन ईव्हीएमविरोधात आंदोलन उभारणार असल्याची भूमिका घेतली. तसेच इतर पक्षदेखील ईव्हीएमविरोधात लढा उभारत आहेत.

शहरात ईव्हीएमविरोधात घेण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत तत्कालीन आणि वर्तमान सरकारांवर आरोपांची सरबत्ती करण्यात आली आली. तसेच आंदोलकांनी 'ईव्हीएम हटाओ देश बचाओ'च्या घोषणा दिल्या. प्रत्येक शासनकर्त्यांनी केवळ स्वतःच्या फायद्यासाठीच ईव्हीएमचा दुरुपयोग केलेला आहे. ही जनतेची स्पष्ट दिशाभूल असल्याने केंद्रातील सरकारला सत्तेत राहण्याचा कुठलाही अधिकार नसल्याचे जनआंदोलनाचे नेते म्हणाले. येणारी विधानसभा निवडणुक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली. यासंदर्भात 21 सप्टेंबरला देशव्यापी आंदोलन छेडण्याचा ईशारा देखील ईव्हीएमविरोधकांनी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details