नागपूर- कोरोनामुळे संपूर्ण राज्यासह नागपुरात सर्वच विकासकामे थांबली आहेत. आरोग्य सुविधा बळकट करण्यावर नागपूर महानगरपालिका भर देत आहे. कोविडमुळे मनपाच्या आर्थिक स्त्रोतांवरही परिणाम पडला आहे. नागपूर शहरात आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ५०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक अनुदान द्यावे, अशी मागणी नागपूर महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती विजय (पिंटू) झलके यांनी केली आहे.
अत्याधुनिक आरोग्य सेवेसाठी ५०० कोटींचे विशेष अनुदान द्या, स्थायी समिती सभापतींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - nagpur mnc chairman Vijay (Pintu) Jhalke
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधाही बळकट करण्यावर नागपूर महानगरपालिकेचा भर आहे. नागपूर शहर उपराजधानीचे शहर आहे. हा विचार करून अत्याधुनिक हॉस्पिटल उभारण्यासाठी आणि विकास कामांना गती देण्यासाठी राज्य शासनातर्फे ५०० कोटींचे विशेष आर्थिक सहाय्य देऊन शहराच्या विकासात हातभार लावावा, अशी विनंती पत्राच्या माध्यमातून सभापती विजय झलके यांनी केली आहे.
यासंदर्भात झलके यांनी एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. कोविड-१९ च्या वाढत्या संक्रमणामुळे मनपाच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे. पाणी कर, मालमत्ता कर व अन्य स्त्रोतांद्वारे येणाऱ्या आर्थिक उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. यामुळे अनेक विकासकामे खोळंबली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधाही बळकट करण्यावर नागपूर महानगरपालिकेचा भर आहे. नागपूर शहर उपराजधानीचे शहर आहे. हा विचार करून अत्याधुनिक हॉस्पिटल उभारण्यासाठी आणि विकास कामांना गती देण्यासाठी राज्य शासनातर्फे ५०० कोटींचे विशेष आर्थिक सहाय्य देऊन शहराच्या विकासात हातभार लावावा, अशी विनंती पत्राच्या माध्यमातून सभापती विजय झलके यांनी केली आहे.
हेही वाचा-नागपुरात कुख्यात गुंडाचा भर रस्त्यात खून; घटना सीसीटीव्हीत कैद