नागपूर -महाविकास आघाडी सरकारचे पहिले अधिवेशन नागपुरात सोमवारी सुरू झाले. विधान परिषदेचे कामकाज सुरू होत असताना न्यायमूर्ती शरद बोबडे यांचा अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला. मंत्री सुभाष देसाई यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. शरद जोशींच्या आंदोलनात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून देण्यासाठी कायद्याची बाजू मांडून केलेली कामगिरी न विसरण्यासारखी असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
हेही वाचा -हिवाळी अधिवेशन : तिसरा दिवसही ठरणार वादळी?
विदर्भाचे पुत्र सर्वोच्च पदी बसल्याचा अभिमान असल्याचे मंत्री सुभाष देसाई यांनी म्हटले. देसाई पुढे म्हणाले, की त्यांचा नागपुरातील बोबडेवाडा कायद्याचे विद्यापीठ आहे. जगाच्या पाठिवरील कायद्याची सर्व पुस्तके इथे आहे. ज्यांना कायद्याच्या क्षेत्रात पुढे जाऊन प्रगती करायची आहे, अशांना मार्गदर्शन करणारे हे स्थळ आहे. कायद्याचे पंडित अशी बोबडे यांची ओळख आहे. त्यांना खेळ आणि तबला संगीत याचीही विषेश आवड आहे. शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून एक मोठा कालखंड त्यांनी खर्ची घातलाय. शरद जोशींच्या काळात कर्जमाफी ही कायद्याने आवश्यक आहे, हे पटवून दिले, असे म्हणत त्यांचे अभिनंदन केले.
हेही वाचा -राष्ट्रपती पदावर असतानाचा प्रतिभाताईंचा राहिलेला सत्कार आता होणार
न्यायमूर्ती बोबडे हे नागपूरच्या मातीचे सुपुत्र आहेत. त्याचा परिवार स्वातंत्र्य चळवळीशी जोडलेला होता. त्यांच्या काळात जी काही आंदोलन झाली त्यांना त्यांचा पाठिंबा राहिलेला आहे. मागील सहा वर्षात आधार कार्ड नसल्याने भारतीयांना मूलभूत सोई सुविधा आणि योजनांपासून वंचित ठेवता येणार नाही, हा महत्वाचा निर्णय त्यांच्या तीन सदस्यीय समितीने घेतल्याचे कॅबीनेट मंत्री नितिन राऊत यांनी म्हटले.
हेही वाचा -नागपूर महापौरांच्या गाडीवर गोळीबार, जोशी थोडक्यात बचावले
शरद जोशींच्या काळात कर्जमाफीची आंदोलने झाली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी न्यायालयात त्यांनी आवाहन केले. शेतकरी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आत्महत्या करत असल्याचे मांडणी त्यानी न्यायलयात केले. नादारीचे फॉर्म भरून न्यायाल्यात खटला उभा करण्याचे काम त्यांनी केले. यामुळे शेतकऱ्यांचा न्यायदाता सर्वोच पदावर विराजमान झाल्याचा अभिमान आहे, असे म्हणत सदाभाऊ खोत यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांचा कार्यकाळात घेतलेल्या निर्णयाने महाराष्ट्राची मान नक्कीच उंचावली आहे. यामुळे ते आगळे वेगळे व्यक्तिमत्व ठरले असल्याचे विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी म्हटले.