महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Draupadi Murmu on Vidarbha Visit: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु 4 जुलैपासून 3 दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर, गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात होणार सहभागी - Draupadi Murmu Vidarbha Visit

महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु पहिल्यांदाच ४ जुलैपासून तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा विदर्भ दौरा निश्चित झाला आहे. त्या वर्धा, गडचिरोली आणि नागपुरात आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

Draupadi Murmu on Vidarbha Visit
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु

By

Published : Jun 28, 2023, 9:20 AM IST

नागपूर :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभात सहभागी होणार आहेत. त्यानंतर नागपूरच्या कोराडी येथील भारतीय विद्या भवनच्या रामायण सांस्कृतिक केंद्राचा लोकार्पण व वर्धा येथील महात्मा गांधी हिंदी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला त्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महर्षी तुलसीदासांच्या रामायणाच्या लेखनापासून ते रामायणाच्या मूळ कथेपर्यंत एकूण 108 चित्रे या दालनात मांडण्यात आली आहेत.


'असा' असेल त्यांचा तीन दिवसीय दौरा :चार जुलै रोजी संध्याकाळी नागपूर आगमन व राजभवन येथे मुक्काम करणार आहेत. 5 जुलै सकाळी 10.30 वाजता गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थिती लावतील. दीक्षांत समारंभानंतर गोंडवाना विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन करणार आहे. विविध शासकीय कामांचे लोकार्पण केल्यानंतर त्या नागपूरला परत येणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता कोराडी येथील भारतीय विद्या भवनच्या रामायण सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण करणार आहेत. 6 जुलै वर्धेच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून त्या उपस्थित राहणार आहेत. नंतर दुपारी नागपूर विमानतळावरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु रवाना होतील.

रामायणाची आकर्षक मांडणी



रामायण सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण :नागपूर येथील कोराडी येथे भारतीय विद्या तर्फे भवनच्या रामायण सांस्कृतिक केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. राष्ट्रपती यांच्या हस्ते या केंद्राचे लोकार्पण होणार आहे. या रामायण सांस्कृतिक केंद्रात चित्र स्वरूपात रामायणाची आकर्षक मांडणी करण्यात आली आहे. तीन एकर जागेवर दक्षिण भारतीय शैलीत हे सेंटर तयात करण्यात आले आहे. दुमजली इमारत आहे, ज्याच्यापहिल्या मजल्यावर महाकाव्य रामायणातील प्रसंग विविध चित्रांच्या स्वरूपात मांडलेले आहेत.

आकर्षक चित्रांची मांडणी


हिंदी, इंग्रजी आणि मराठीत माहिती :चित्रांमधील घटना आणि व्यक्तिमत्त्वे समजून घेण्यासाठी येथे हिंदी, इंग्रजी आणि मराठीत माहिती देण्यात आली आहे. आतील सजावट ही राजवाड्यासारखीच असून, रंगसंगती, ध्वनी व्यवस्था आणि प्रकाश योजना त्याच पद्धतीने करण्यात आली आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर, भारतीय स्वातंत्र्यातील क्रांतिकारकांच्या योगदानावर आधारित चित्र गॅलरी तयार करण्यात आली आहे.

हेही वाचा :


  1. President's Uttarakhand tour today: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज उत्तराखंड दौरावर , विमानतळ ते राजभवनपर्यंत कडक सुरक्षा
  2. Power outage during Presidents address: राष्ट्रपतींचे अभिभाषण सुरू असताना अनेकदा गेली लाईट
  3. Droupadi Murmu Shimla Visit : राष्ट्रपती मुर्मूंचा हिमाचल दौरा, जवानांनी दिला गार्ड ऑफ ऑनर

ABOUT THE AUTHOR

...view details