नागपूर -जिल्ह्यात कोरोनाबाधितांमध्ये घट होताना दिसत आहे. मात्र, रुग्णसंख्येसोबतच शहारासह ग्रामीण भागात मृत्युदर घटल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसात सातत्याने ग्रामीण भागातील मृत्युदर कमी होऊन पाच दिवसात एकही रुग्ण न दगावल्याची दिलासादायक बातमी समोर आली आहे. यासोबत रुग्णालयात केवळ 300च्या जवळपास रुग्ण उपचार घेत आहेत. या प्रकृती गंभीर असणाऱ्या रुग्णाची संख्या अल्प होत असल्याने दिलासा मिळाला आहे.
नागपूर जिल्ह्यात बुधवारी आलेल्या अहवालात 8 हजार 201 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 74 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यामध्ये शहरी भागात 43 तर ग्रामीण भागात 30 बाधित मिळून आले आहेत. तसेच 2 जण दगावले आहेत. यामध्ये शहरी भागात 1, तर मागील पाच दिवसांपासून ग्रामीण भागात एकही रुग्ण मिळून आलेला नाही. तर जिल्ह्याबाहेरील 1 जण दगावले आहे. तेच 232 जणांपैकी शहरात 152 तर ग्रामीण 80 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यात 305 जण हे रुग्णालयात उपचार घेत आहेत. 871 रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहे.
हेही वाचा -यमराजाच्या हातून काढून घेतला आईने काळजाचा तुकडा, डॉक्टरांनी केले होते मृत घोषित
9 हजारांहून अधिक मृत्यू -