नागपूर- अजनी पोलीस ठाण्याअंतर्गत जुगार अड्डयावर छापा मारत 27 लोकांवर जुगार प्रतिबंध अधिनियम कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. याप्रकरणी दोघांना अजनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नागपुरात २७ जुगारांवर कारवाई, ९ लाखांचा मुद्देमाल जप्त - crime
अजनी पोलीस ठाण्याअंतर्गत जुगार अड्डयावर छापा मारत 27 जुगाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून रोख रक्कम, दुचाकी व अन्य साहित्य, असा 9 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस उपायुक्त कार्यालय परिमंडळ 5
संदीप नाडी, पंकज धोटे, असे आरोपींचे नाव आहे. पंकज धोटेच्या घरी हा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकणी छापा टाकला. यामध्ये 2 लाख 94 हजार रूपयांची रोकड, दुचाकी व अन्य साहित्य असा एकूण 9 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
हेही वाचा - शेतकऱ्यांनी शेतीतील नव्या तंत्रज्ञानाचा फायदा घ्यावा - नितीन गडकरी
Last Updated : Nov 27, 2019, 3:20 PM IST