महाराष्ट्र

maharashtra

नागपुरात म्यूकरमायकोसिस आजारावर अ‌‌ॅक्शन प्लॅनची निर्मिती; अधिकाऱ्यांसह तज्ज्ञांच्या बैठकीत चर्चा

ब्लॅक फंगस किंवा म्यूकरमायकोसिस या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. या आजारावरील औषधे अगोदरच महागडी आहेत. त्यातच अजून काळाबाजारी करून ती औषधे आणखी अधिक दरात विकली जात आहे.

By

Published : May 16, 2021, 3:55 PM IST

Published : May 16, 2021, 3:55 PM IST

ETV Bharat / state

नागपुरात म्यूकरमायकोसिस आजारावर अ‌‌ॅक्शन प्लॅनची निर्मिती; अधिकाऱ्यांसह तज्ज्ञांच्या बैठकीत चर्चा

नितीन गडकरी
नितीन गडकरी

नागपूर -शहरात म्यूकरमायकोसिस या आजाराचा थैमान वाढत चालला आहे. या आजारामुळे अनेकांना आपले डोळे गमवावे लागले आहे. तर काहीचे जबडे काढावे लागले. यासाठी या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी एक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत यावर तज्ज्ञांसह प्रशासकीय यंत्रणेसोबत चर्चा करण्यात आली.


औषधांचा काळाबाजार

ब्लॅक फंगस किंवा म्यूकरमायकोसिस या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. या आजारावरील औषधे अगोदरच महागडी आहेत. त्यातच अजून काळाबाजारी करून ती औषधे आणखी अधिक दरात विकली जात आहे. यावर उपाययोजना करून सामान्य नागरिकांना कमी दरात उपचार मिळावेत यासाठी उपाययोजना सुरू आहेत.

प्रशासनाच्यावतीने अ‌‌ॅक्शन प्लॅनवर काम
ब्लॅक फंगस किंवा म्यूकरमायकोसिस या आजारावर मिळणारे एम्फोटेरेसीन बी हे इंजेक्शन बनवण्याची परवानगी मिळाल्याने आता स्वस्तात औषध उपलब्ध होणार आहे. पण या इंजेक्शन निर्मितीला आणखी 15 दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. नागपुरात सध्या 45 पेक्षा जास्त रुग्ण शासकीय दंत महाविद्यालयात तर 11 रुग्ण हे मेयोत रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर या आजारामुळे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या रुग्णांचा संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाच्यावतीने अ‌‌ॅक्शन प्लॅनवर काम केले जात आहे. या बैठकीत खासदार डॉ. विकास माहात्मे विभागीय आयुक्त संजीव कुमार, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details