नागपूर - गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या एकत्रित करून संघटीत गुन्हेगारी करणारा माया गँगचा म्होरक्या सुमित चिंतलवार याला त्याच्या साथीदारांसह अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून दोन विदेशी पिस्तूल, जीवंत काडतूस आणि तलवार जप्त केली असून गुन्हेशाखा पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
नागपुरातील माया गँगचा म्होरक्या जेरबंद; विदेशी जीवंत पिस्तुलासह काडतुसे जप्त
नागपुरात एका कुख्यात गुंडाला अटक करून दोन विदेशी पिस्तूल, जीवंत काडतूस आणि तलवार जप्त केली आहेत.
सुमित हा खुंखार आरोपी आहे. त्याच्यावर १०च्यावर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण, अंमली पदार्थ आणि दारू तस्करीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. नागपुरात नव्हेतर इतर शहरात देखील त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. कुख्यात गुंड सुमित हा काही दिवस तडीपार होता. त्यावेळीही त्याने अनेक गुन्हे केले आहेत. तो अनेक वेगवेगळ्या गुंडांना अकत्रित करून माया गँग चालवायचा. आज देखील एका प्रतिस्पर्धी टोळीतील एकाचा गेम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी छापा टाकत त्याला अटक केली.