महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

इंधनावर सेस लावल्याने पेट्रोल-डिझेल महागले; नागपूरकर नाराज

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी संसदेत मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील प्रथम अर्थसंकल्प सादर केला.

By

Published : Jul 6, 2019, 12:59 PM IST

बजेटमध्ये इंधनावर सेस लावल्याने पेट्रोल, डिझेल महागले ; नागपूरकर नाराज

नागपूर - अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे भाव तब्बल अडीच रुपयांपेक्षा जास्त दराने वाढले आहेत. अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर अतिरिक्त सेस लावल्याने ही दरवाढ झाली आहे. या दरवाढीमुळे नागपूरच्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बजेटमध्ये इंधनावर सेस लावल्याने पेट्रोल, डिझेल महागले ; नागपूरकर नाराज

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी शुक्रवारी संसदेत मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. महागाई नियंत्रणात यायला हवी यासाठी अर्थमंत्री काही महत्त्वाच्या घोषणा करतील यासह अनेक अपेक्षा सर्वसामान्यांना लागल्या होत्या. मात्र, याउलट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोल आणि डिझेलवर अतिरिक्त सेस लावल्याने पेट्रोल आणि डिझेलचे भाव अडीच रुपयांपेक्षा जास्त दराने वाढले आहेत.

यावर नागपूरकरांनी तिखट प्रतिक्रिया देत आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details