महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिवाळी अधिवेशनात विरोधक सरकारला कोंडीत पकडणार - हिवाळी अधिवेशन

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची रणनीती ठरण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली.

ngp
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक

By

Published : Dec 15, 2019, 12:28 PM IST

Updated : Dec 15, 2019, 2:13 PM IST

नागपूर - विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची रणनीती ठरण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, संजय कुटे, सुरेश धस, महादेव जानकर, विनायक मेटे, बबनराव लोणीकर, प्रसाद लाड, रणजित पाटील आदी नेते सहभागी झाले होते.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक

१०५ आमदारांचा विरोधीपक्ष असल्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधी पक्षांनी कंबर कसलेली आहे. सरकारला विविध मोर्चावर घेण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. या बैठकीत सरकारवर चौतर्फा हल्ले कसे केले जातील यावर रणनीती आखली गेल्याची माहिती मिळते आहे.

Last Updated : Dec 15, 2019, 2:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details