महाराष्ट्र

maharashtra

राज्यपालांच्या अभिभाषणवर चर्चा, प्रविण दरेकरांनी विविध प्रश्नाकडे वेधले लक्ष

By

Published : Dec 19, 2019, 11:28 AM IST

दरेकर यांनी सभागृहात बोलताना, कोकण पर्यटनासाठी 1 हजार कोटी द्या, पर्यटन विकासाला चालना द्या, कोल्ड स्टोरेज, मच्छीमार लोकांसाठी मच्छी निर्यात करण्यासाठी व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी केली. तसेच ज्येष्ठ नागरिकांससाठी सुरक्षा आधार केंद्र उभारले पाहिजे. त्यांना औषधासह इतर वस्तू घरापर्यंत पोहोचवावे,यासाठी काही सामाजिक संस्थांना समाविष्ट करून घेतल्यास फायदा होईल असेही त्यांनी यावेळी सुचित केले.

pravin darekar
प्रविण दरेकर - विरोधी पक्षनेते विधानपरिषद

नागपूर- हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सभागृहात विविध मुद्यांवर प्रश्न उपस्थित केले. यामध्ये प्रामुख्यांनी त्यांनी पर्यटन व्यावसायिक, मच्छिमारांचे प्रलंबित प्रश्न, जेष्ठ नागरिकांचा समस्या, गुन्हेगारी यासारख्या प्रश्नावर त्यांनी प्रामुख्याने लक्ष वेधून घेतले.

दरेकर यांनी सभागृहात बोलताना, कोकण पर्यटनासाठी 1 हजार कोटी द्या, पर्यटन विकासाला चालना द्या, कोल्ड स्टोरेज, मच्छीमार लोकांसाठी मच्छी निर्यात करण्यासाठी व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी केली. तसेच ज्येष्ठ नागरिकांससाठी सुरक्षा आधार केंद्र उभारले पाहिजे. त्यांना औषधासह इतर वस्तू घरापर्यंत पोहोचवावे,यासाठी काही सामाजिक संस्थांना समाविष्ट करून घेतल्यास फायदा होईल असेही त्यांनी यावेळी सुचित केले.

तसेच राज्यात व मुंबई शहरात गुन्हेगारी डोके वर काढत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अनेक गुन्हेगारी टोळ्या दहशत माजवत आहेत. तसेच दोन ठिकाणी गोळीबाराच्या घटना झाल्या असल्याच्या घटनांकडेही त्यांनी लक्ष वेधले. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने पोलिस यंत्रणा सक्षम करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच नागरिकांना संरक्षण देण्यासठी आवश्यक निधीची तरतूद करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

मुंबई वाहतूक व्यवस्था तयार करून अहवाल तयार करून सभागृहात मांडावा, पाच दहा वर्षाच्या उल्लेख करून काम करावे. महिला सुरक्षेचा प्रश्नीही त्यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केले. याचबरोबर शालेय पोषण आहारचे रखडलेले पैसे देण्याचीही त्यांनी यावेळी मागणी केली. मोठ्या उद्योजकांना काम देऊन मोठे करू नका, बचत गटांना कर्ज द्या, चांगली व्यवस्था करुन त्यांना काम करू द्या, त्यासाठी लागणारी साधन सामुग्रीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी यावेळी सभागृहात केली.

जयंत पाटील -

राज्यपालांचे भाषणवर चर्चा होतांना हे निर्णय मागच्या सरकराने घेतलेली असल्याची माहिती अर्थमंत्री जयंत पाटील यांनी दिली. तसेच हे सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल. मात्र, यावर धोरणात्म निर्णय घ्यायला वेळ लागेल. ही कर्जमाफी कशाप्रकारे द्यायची त्याची तरतूद करण्यासाठी वेळ लागणार असल्याचे पाटील सभागृहात म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details