नागपूर - शेतकऱ्यांना 25 हजार हेक्टरी मदतीच्या मागणीवर विरोधक ठाम आहेत. विरोधकांकडून सलग पाचव्या दिवशीही विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजारांची मदत करणार, असे आश्वासन दिले होते. आपण दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी आंदोलन करत असल्याचे विरोधक म्हणत आहेत.
हेही वाचा -'लोकांना वारंवार स्वतःच नागरिकत्व सिध्द करावं लागणं हेच क्लेशदायक''