नागपूर - पेंच कालव्यातून नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनी मध्ये मोठ्या प्रमाणात गळती असल्याने आज पासून नागपूर शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. याचा फटका शहरातील ६५ टक्के भागाला बसणार आहे. सर्व १० झोन मधील बराचसा भाग यात समाविष्ट आहे. पेंचमधून येणाऱ्या २७ किलोमीटर इटगाव ते करमभाड या गावादम्यान या जलवाहिनीत २३०० मिलिमीटर आकाराचा व्यास असलेल्या ठिकाणी सर्वाधिक गळती आहे. त्यामुळे रोज ५ MLD पाणी वाया जात आहे. याचा फटका उन्हाळ्यात बसू शकतो. त्यामुळे ही दुरुस्ती हातात घेतल्याची माहिती OCW चे जनसंपर्क अधिकारी सचिन द्रवेकर यांनी दिली आहे.
ऐन हिवाळ्यात नागपूरकरांवर पाणी संकट ओढवले आहे. हे पाणी संकट नैसर्गिक नसून कृत्रिम आहे. नागपूर महानगरपालिकेच्या जलप्रदाय समितीच्या निर्णयानुसार आजपासून पुढील एक महिना नागपूरकरांसाठी एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. नागपूरला पाणी पुरवठा होणाऱ्या जलाशयांमध्ये भरपूर पाणी शिल्लक असले तरी पाणी वाहून आणणाऱ्या २३०० मिलिमीटरच्या पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने त्यांच्या दुरुस्तीसाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. आजपासून या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरवात झाल्याची माहिती शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या ओसीडब्ल्यूचे जनसंपर्क अधिकारी सचिन द्रवेकर यांनी दिली.
हेही वाचा -ग्रामपंचायत निवडणूक : अपहरण करून अर्ज मागे घेण्यास भाग पाडले; चौघांविरुद्ध गुन्हा
गळती वाढल्यानेच पाईपलाईन दुरुस्तीच्या कामाला सुरुवात